शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दोन वर्षांची झाली आलिया-रणबीर यांची लेक, बॉलिवूडकडून सेलिब्रेशन, Unseen Photos व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 6, 2024 | 4:48 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ranbir Kapoor and Alia Bhatt daughter Raha second birthday neetu and riddhima shared special post and wished her.

रणबीर कपूर व आलिया भट्ट यांची लेक ‘राहा’च्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त आजी व आत्याच्या खास पोस्ट

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री आलिया भट्ट हे दोघे त्यांची कामामुळे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ व्हायरल होत असतात. या दोघांबरोबरच सोशल मीडियावर त्यांची लेक अर्थात राहा कपूरच्याही चर्चा होताना पाहायला मिळतात. राहा जेव्हा जेव्हा पापाराजींच्या कॅमेऱ्यात कैद होते. तेव्हा तेव्हा ती तिच्या क्युट एक्सप्रेशन्सनी सर्वांचं लक्ष वेधून घेते. अशातच आज रणबीर-आलिया यांच्या लेकीचा म्हणजेच राहाचा दूसरा वाढदिवस आहे. यानिमित्त अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राहाला शुभेच्छा दिल्या आहेत. (Raha Kapoor Birthday)

राहाच्या वाढदिवसानिमित्त आजी नीतू कपूर यांनी तिचा एक अतिशय गोंडस फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राहाचा क्यूट अंदाज पाहायला मिळत आहे. नीतू कपूरने शेअर केलेल्या फोटोमध्ये राहा आई आलिया आणि वडील रणबीर कपूर यांच्यामध्ये कारमध्ये बसलेली आहे. तर रणबीर राहा तिच्या डोक्यावर प्रेमाने चुंबन घेत आहे. या फोटोमध्ये राहाच्या चेहऱ्यावरील हावभाव बघून असे वाटते की ती तिच्या आई-वडिलांमध्ये दडली आहे. राहाचा तिच्या आई-वडिलांबरोबरचा फोटो शेअर करत नीतू यांनी “आमच्या प्रेमाचा वाढदिवस…’Our Pyaar’s Birthday’ असं म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

आजीबरोबरच आत्यानेही राहाला वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. रिद्धिमा कपूर साहनीने तिची लेक समाराबरोबरचा राहाचा क्यूट फोटो शेअर केला आहे. यामध्ये राहा गोड स्माइल देताना दिसत आहे. “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा क्यूटी, आम्हा सर्वाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे” असं म्हणत रिद्धिमाने राहाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. नीतू कपूर व रिद्धिमा कपूर यांनी शेअर केलेले हे दोन्ही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या राहाच्या फोटोला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच सोशल मीडियाद्वारे अनेकांनी राहाला शुभेच्छाही दिल्या आहेत.      

आणखी वाचा – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’मुळे विकी कौशलला भिती, ‘छावा’ चित्रपटाची माघार, प्रदर्शन पुढे ढकलले

आजीबरोबरच आत्यानेही राहाला वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. रिद्धिमा कपूर साहनीने तिची लेक समाराबरोबरचा राहाचा क्यूट फोटो शेअर केला आहे. यामध्ये राहा गोड स्माइल देताना दिसत आहे. “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा क्यूटी, आम्हा सर्वाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे” असं म्हणत रिद्धिमाने राहाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. नीतू कपूर व रिद्धिमा कपूर यांनी शेअर केलेले हे दोन्ही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या राहाच्या फोटोला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच सोशल मीडियाद्वारे अनेकांनी राहाला शुभेच्छाही दिल्या आहेत.   

आणखी वाचा – Tula Shikvin Changalach Dhada : भुवनेश्वरीच चारुलता असल्याचे सत्य अक्षरासमोर येणार, ‘त्या’ कृतीमुळे मास्तरीण बाईंनी अचूक ओळखलं, नवं वळण

दरम्यान, १४ एप्रिल २०२२ रोजी या जोडप्याने लग्नगाठ बांधत आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली. अभिनेत्रीला त्याचवर्षी ६ नोव्हेंबरला कन्यारत्न झालं. पुढे, काही दिवसांनी आलिया-रणबीर यांनी त्यांच्या लाडक्या लेकीचं नाव राहा असं ठेवलं. मग गेल्यावर्षी ख्रिसमिसच्या दिवशी या जोडप्याने राहाचा चेहरा पापाराझींसमोर आणला. यावेळी राहाचे अनेक फोटो सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखे पसरले. यानंतर इंटरनेटवर राहाचा गोंडस अंदाज, तिचे निळे डोळे, गुबगुबीत गाल या खास लूकची चांगलीच चर्चा झाली.  

Tags: Raha Kapoor BirthdayRaha Kapoor Birthday NewsRaha Kapoor Second Birthday
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Next Post
Navri Mile Hitlerla serial updates new promo AJ accepted Leela as his wife see the details

Navri Mile Hitlerla : एजेंकडून लीलाचा गृहलक्ष्मी म्हणून स्वीकार, सगळ्यांसमोर मंगळसूत्रही घातलं, नात्याला नवं वळण  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.