शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सहा वर्षांची माझी लेक आता…”, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता बलात्कार प्रकरणामुळे घाबरला, म्हणाला, “तिच्या भविष्याबद्दल…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 23, 2024 | 2:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
neil nitin mukesh on kolkata rape case

कोलकाता बलात्कार प्रकरणानंतर व्यक्त केली मुलीबद्दल चिंता

देशात सर्वत्र कोलकता येथे सरकारी रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरवर झालेल्या बलात्कार व हत्येचे पडसाद उमटत आहेत. या प्रकरणावर देशातील जनतेने या सर्व प्रकारांवर निषेध नोंदवला आहे. मनोरंजन विश्व तसेच इतर क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे देशातील महिलांच्या सुरक्षिततेबद्दलही प्रश्न उपस्थित झाले आहेत. हृतिक रोशन, आलिया भट्ट, अनुष्का शर्मा, करीना कपूर या कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्येच आता अभिनेता नील नितीन मुकेशने बलात्कार प्रकरणावर आपले मत व्यक्त केले असून चिंता व्यक्त केली आहे. (neil nitin mukesh on kolkata rape case)

नील नेहमी संवेदनशील विषयांवर आपले मत मांडत असतो. नुकताच त्याने ‘बुजोका’ला मुलाखत दिली. यावेळी त्याने कोलकातामध्ये भयानक दुर्घटनेसंदर्भात भाष्य केले आहे. जेव्हा या घटणेबद्दल त्याने पहिल्यांदा ऐकले तेव्हा तो मुलगी व बायकोबरोबर सासरी गेला होता. तसेच ही घटना ऐकताच तो एका तासापेक्षा अधिक काळ रडत होता. नीलने सांगितले की, “जेव्हा मी या घटनेबद्दल पहिल्यांदा ऐकले तेव्हा माझी पत्नी व मुलगी तिच्या आईच्या घरी गेली होती. मी घरी एकटाच होतो. जशी मी ही बातमी ऐकली तेव्हा मी रडायला लागलो. मी एक तास शांतच बसून होतो. त्याचक्षणी मी माझ्या पत्नीलं कॉल केला आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला”.

आणखी वाचा – “नराधमांना कधी शिक्षा मिळणार?”, बलात्कार प्रकरणांवर तेजश्री प्रधानचा सवाल, म्हणाली, “आता समाजात…”

View this post on Instagram

A post shared by Neil Nitin Mukesh (@neilnitinmukesh)

पुढे तो म्हणाला की, “मी खूप भावनिक व्यक्ती आहे. मी प्रत्येक बापासारखाच एक माझ्या मुलीचा विचार करतो. मुलीबरोबर अनेक रील्स करुन शेयर करतो. आता मी माझ्या मुलीच्या भविष्याबद्दल विचार करतो तेव्हा विचार करतो की ती मोठी होऊन काय करेल? पण आता जे घडलं आहे विचार करून मला खूप भीती वाटत आहे”.  

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तुझी बोटं तोंडात घाल”, इरिनावर निक्कीने राग काढताच वैभव भडकला, भांडणात लाथेने भांडी उडवली अन्…

नीलच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, २०१७ साली त्याने रुक्मिणी सहायबरोबर लग्न केले. त्यानंतर २०१८ साली त्यांना मुलगी झाली तिचे नाव नुरवी असे ठेवले. तो नेहमी पत्नी व मुलीबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेयर करताना दिसतो.

Tags: daughterkolkata rape caseneil nitin mukesh
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate Video

मुग्धा वैशंपायनला सासरकडच्या घराची ओढ, नवऱ्याचा भजन करतानाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "तिथली आठवण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.