नवाजुद्दीन सिद्दीकी हा चित्रपट जगतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या तो त्याच्या आगामी ‘राऊथू का राजा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेता नुकताच रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्ट शोमध्ये दिसला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर मनमोकळेपणाने भाष्य केले. या अभिनेत्याने त्याच्या आयुष्यातील धूम्रपानाच्या व्यसनाबद्दल खुलेपणाने भाष्य केलं आहे. या मुद्द्यावर बोलताना त्यांनी नात्यातील फसवणुकीवरही बोलायला सुरुवात केली. त्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकीने फसवणूक व लग्न या दोन्ही मुद्द्यांवर खुलेपणाने आपले मत मांडले. या कार्यक्रमात रणवीर अलाहाबादियाने नवाजला विचारले की, तुम्ही कधी स्मोकिंग केले आहे का? यावर अभिनेत्याने लाजत कबूल केले आणि म्हणाला, “माझ्यासोबत काही लोक धूम्रपान करत होते, म्हणून मी देखील केले. मला त्याचा प्रचार करायचा नाही. ही माझी चूक होती आणि त्याबद्दल मी दिलगीर आहे”. (Nawazuddin Siddiqui On Wedding and relationship)
या संभाषणात रणवीर अलाहबादियाने सांगितले की, “तो धूम्रपान करायचा परंतु त्याच्या मैत्रिणीने त्याला यासाठी थांबवले”. रणवीर अलाहाबादिया पुढे म्हणाला की, “नंतर गर्लफ्रेंडनेही तुमची फसवणूक केली का?”. याला उत्तर देत नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, “तुम्हाला कोणी फसवलं तर आमचं काय होईल?, प्रत्येक पावलावर आमची फसवणूक झाली”. तो म्हणाला की त्याच्याबरोबर वेगळ्या स्तराची फसवणूक झाली, पण नंतर त्याची सवय झाली. नवाज म्हणाला, “फसवणूक झाली तेव्हा खूप राग आला. त्यानंतर त्याने गाडी पकडली आणि निघून गेला. या दुखलेल्या मनामुळे तो शहाणा झाला”.
नवाजुद्दीन सिद्दीकीनेही लग्नाच्या प्रश्नाला उत्तर दिलं. लग्न करायचे की नाही, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, “मला बोलायचे आहे, पण चुकीचे बाहेर येऊ नये. लग्न करू नये. लग्न करण्याची काय गरज आहे?, जर तुम्ही प्रेमात असाल तर तुम्ही लग्नाशिवायही राहू शकता. लग्नानंतर लोक एकमेकांना गृहीत धरु लागतात. हे माझे, हे माझे अशा गोष्टी घडू लागतात. जर तुमचे लग्न झाले नसेल आणि तुमची मैत्रीण असेल तर तुम्ही एकमेकांवर खूप प्रेम करता. कुठेतरी ते लग्नानंतर संपुष्टात येऊ लागते”.
नवाझउद्दीन सिद्दीकी यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, नवाजुद्दीन सिद्दीकीचा चित्रपट ‘रौथु का राज’ हा चित्रपट आजपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात नवाज तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.