मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुंबईतील महागड्या ठिकाणी आमिर खानने खरेदी केलं नवं घर, एकूण किंमत आहे तब्बल…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 28, 2024 | 11:15 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aamir Khan Property

मुंबईतील महागड्या ठिकाणी आमिर खानने खरेदी केलं नवं घर, एकूण किंमत आहे तब्बल...

आमिर खानने मुंबईतील आलिशान भागात असलेल्या पाली हिलमध्ये एक मोठी मालमत्ता खरेदी केली असल्याची चर्चा आहे. अभिनेत्याने पाली हिल परिसरातील एका इमारतीत अपार्टमेंट खरेदी केले आहे. त्याची किंमत नऊ कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.स्क्वेअर यार्डसकडे आमिरच्या नवीन अपार्टमेंटची कागदपत्रे आहेत. ज्यामध्ये अपार्टमेंटची किंमत ९.७५ कोटी रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे अपार्टमेंट आधीच तयार असून १,०२७ चौरस फूट आहे. हा करार २५ जून रोजी अंतिम झाला, ज्यासाठी आमिर खानने ३० हजार रुपये नोंदणी शुल्क आणि ५८.५ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले. (Aamir Khan Property)

आमिरचे हे नवीन अपार्टमेंट पाली हिल परिसरात बेला विस्टा अपार्टमेंट्स नावाच्या एका अत्याधुनिक इमारतीत आहे. बेला विस्टा अपार्टमेंट्स आणि मरीना अपार्टमेंट्समध्ये आमिर खानच्या आधीच अनेक मालमत्ता आहेत. याशिवाय अभिनेत्याचे वांद्रे येथील समुद्र किनाऱ्यावर ५ हजार स्क्वेअरमध्ये एक आलिशान घर आहे. त्यात दोन मजले आहेत. घरात एक मोठा भाग आहे, जिथे पार्टी व कार्यक्रम आरामात आयोजित केले जाऊ शकतात.

आणखी वाचा – Video : नवऱ्याच्या ‘त्या’ वागण्यामुळे आरती सिंहचा राग अनावर, रागाच्या भरात केलं असं कृत्य, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Jio Studios (@officialjiostudios)

२०१३ मध्ये आमिर खानने पाचगणीमध्ये सात कोटी रुपयांना एक फार्महाऊस खरेदी केले होते, जे दोन एकरमध्ये पसरले आहे. याशिवाय आमिर खानने काही व्यावसायिक मालमत्तांमध्येही गुंतवणूक केली आहे. उत्तर प्रदेशातील हरदोई येथे आमिर खानची २२ घरे असल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, आमिर खानची एकूण संपत्ती १८६२ कोटी रुपये आहे

आणखी वाचा – “प्रत्येक पावलावर फसवणूक झाली आणि…”, रिलेशनशिप व लग्नाबाबत नवाजुद्दीन सिद्दीकीचा मोठा खुलासा, म्हणाला, “लग्नानंतर एकमेकांना…”

आमिर खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, आमिर खान सध्या ‘सीतारे जमीन पर’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यंदाच्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो. आमिर याआधी २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात दिसला होता, जो खूप फ्लॉप झाला होता.

Tags: aamir khanaamir khan actorAamir Khan Propertyentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Adinath Kothare's daughter Jija asked him "What is the difference between a boyfriend and a friend?" question

"बॉयफ्रेंड व फ्रेंडमध्ये फरक काय?" आदिनाथच्या कोठारेच्या लेकीने त्याला विचारला वेगळाच प्रश्न, म्हणाला, "बरेच लोक..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.