गुरूवार, सप्टेंबर 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अखेर अ‍ॅडशूटचं सत्य अहिल्यादेवींसमोर आलं, अवॉर्ड सोहळ्याला दिलेलं सरप्राइज पडणार महागात, काय निर्णय घेणार?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 28, 2024 | 10:25 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paaru Serial Update

अखेर अ‍ॅडशूटचं सत्य अहिल्यादेवींसमोर आलं, अवॉर्ड सोहळ्याला दिलेलं सरप्राइज पडणार महागात, काय निर्णय घेणार?

‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, त्या गावाकडच्या शिक्षिका आदित्यला भेटायला म्हणून किर्लोस्कर बंगल्यात येतात. तेव्हा प्रीतमला निरोप जातो की तुम्हाला भेटायला कोणीतरी आलं आहे प्रीतमला असं वाटतं की, ते अवॉर्ड फंक्शन मधील लोकं आली असावीत म्हणून तो त्यांना जाब विचारायला खाली येतो आणि त्यांना न बघताच तुम्ही असा कसा निर्णय घेतला, एका दिवसात कोणी आम्हाला अवॉर्ड बद्दल सांगतं का?, असं जोर जोरात ओरडू लागतो आणि त्या शिक्षिकेला पाहिल्यावर तो शांतच होतो आणि तरीसुद्धा तो तिला म्हणतो की, तुम्ही अवॉर्ड मधून आलेल्या आहात का?, तुम्ही यापूर्वी आम्हाला कल्पना का नाही दिली?, आम्ही काय रिकामी आहोत का?, तेव्हढ्यात तिथे पारू येते आणि दोघांचे भांडण सोडवते आणि दोघांना शांत करते. (Paaru Serial Update)

यानंतर त्या शिक्षिका सांगतात की, मी अवॉर्ड मधून काही आलेली नाही आहे असं म्हटल्यावर प्रीतम शांतच बसतो तर इकडे आदित्य खाली आलेला असतो तेव्हा आदित्य म्हणतो की मी स्वतः आदित्य किलोस्कर आहे तुमचं काय काम आहे माझ्याकडे. यावर त्या मॅडम सांगतात की, तुमच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये मला तुम्ही अपॉईंट केलं आहे त्यासाठीच मी इथे आली आहे आणि मला तुम्हाला भेटायचं होतं म्हणून मी इथवर आले. यावर आदित्य त्यांचं स्वागत करतो आणि प्रीतमला त्यांची सगळी सोय करायला सांगतो अहिल्यादेवी आणि श्रीकांत बोलत असतात तेव्हा त्या आदित्यचाच विचार करत असतात.

आणखी वाचा – प्रतिबिंब शक्तीबद्दल माहिती झाल्यानंतर रुपालीकडून नेत्राला बाळाच्या जीवाबद्दल धमकी, काय असेल नेत्राचं पुढचं पाऊल?

आदित्यचं कौतुक करतात तितक्यातच आदित्य आईला सगळं काही सांगायचे म्हणून फोन करतो आणि व्यवस्थित पोचलीस का वगैरे अशी चौकशी करतो. त्यानंतर तो म्हणतो आई मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. यावर अहिल्यादेवी त्याला थांबवतात आणि सांगतात की, आजचा दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तू काहीच आज बोलू नकोस आणि असं म्हणत त्याला त्यांच्या बेडरूम मध्ये असलेल्या नव्या सूट घालून जाण्याबद्दल सांगतात. फोन ठेवल्यानंतर श्रीकांत अहिल्यादेवींना विचारतो की आदित्यला काहीतरी आपल्याशी महत्वाचं बोलायचं होतं त्याला तू बोलू दिलं नाही काय असेल ते महत्त्वाचं?, असं म्हटल्यावर अहिल्या देवी विचार करु लागतात. मात्र अहिल्या देवींचा गैरसमज होतो की अवॉर्ड फंक्शनच्या वेळेला आपण त्याच्याबरोबर नाही आहोत म्हणून तो कदाचित नर्वस असावा, असं त्या म्हणतात. तर संध्याकाळी सगळेजण अवॉर्ड फंक्शनसाठी निघालेले असतात. सगळेजण या सोहळ्याला जातात. त्यानंतर तिथं अहिल्यादेवी व श्रीकांतही येतात. मात्र अहिल्यादेवी व श्रीकांत यांनी आम्ही आले असल्याची अनाउन्समेंट करू नका अशी सक्त ताकीद दिलेली असते. त्यांना आदित्य व प्रीतमच्या चेहऱ्यावरचा आनंद पहायचा असतो.

आणखी वाचा – सीताचा शिवाबद्दलचा रोष रामभाऊंच्या जीवावर बेतणार का?, कशी सांभाळणार ही परिस्थिती?, नवं संकट

आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, अहिल्यादेवी स्टेजवर उभं राहून थेट भाषण देतात आणि आदित्यचं खूप कौतुक करतात. तितक्यातच जाहिरातीची एवी लागते आणि आदित्यचा चेहरा त्यांच्यासमोर येतो हे पाहून त्यांनाही खूप मोठा धक्का बसतो. आता अहिल्यादेवी यावर काय निर्णय घेणार हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.

Tags: marathi serialpaaru marathi malikapaaru serialPaaru Serial Updatezee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Bigg Boss fame Aarti Singh angry on her husband video viral on social media.

Video : नवऱ्याच्या ‘त्या’ वागण्यामुळे आरती सिंहचा राग अनावर, रागाच्या भरात केलं असं कृत्य, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.