अभिनेता करण सिंग ग्रोव्हर व बिपाशा बासु हे नेहमी चर्चेत असलेले दिसून येतात. २०१६ साली दोघंही लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्कादेखील बसला. त्यानंतर २०२२ साली बिपाशाने गोंडस मुलीलादेखील जन्म दिला. मुलीचे नाव त्यांनी देवी असे ठेवले. मात्र जन्मानंतर देवीच्या आरोग्याची अपडेट समोर आली होती. मुलीच्या हृदयाला छेद असल्याने करण व बिपाशावर दुखाचा डोंगर कोसळला होता. केवळ तीन महिन्याच्या मुलीवर ओपन हार्ट सर्जरी करावी लागली होती. मात्र अशातही न डगमगता त्यांनी या प्रसंगाला खंबीरपणे तोंड दिले. (Karan singh grover on daughetr open heart surgery)
करण व बिपाशा त्यांच्या मुलीबरोबरचे अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. देवीला अनेकांची पसंतीदेखील मिळत असते. अशातच आता करणने दिलेली मुलाखत चर्चेत आली आहे. त्याने मुलीला फायटरदेखील म्हंटलं आहे. ‘दैनिक भास्कर’बरोबर बोलताना करणने सांगितलं की, “आयुष्यामध्ये खूप कठीण प्रसंग आले. पण मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. माझ्याबरोबर काहीही चुकीचं झालं नाही. पण जेव्हा माझ्या तीन महिन्याच्या मुलीच्या हृदयात दोन छिद्र आहेत हे समजलं तेव्हा आमच्या पायाखालची जमीन सरकली”.
पुढे तो म्हणाला की, “बिपाशासाठी देखील तो वाईट काळ होता. छोट्याश्या जिवाने जे काही सहन केलं आहे ते मी शब्दांत नाही सांगू शकत. देवीच्या छातीपासून पोटापर्यंत एक मोठी खूण आहे. मी व बिपाशाने खूप काही सहन केलं आहे. पण जे काही घडलं त्याला आम्ही दोघंही धीराने सामोरे गेलो”.
बिपाशा व करण यांची ओळख ‘अलोन’ या चित्रपटादरम्यान झाली होती. यावेळी त्यांच्यामध्ये मैत्री झाली व मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २०२२ साली त्यांना मुलगी झाली. सध्या देवी एक वर्ष नऊ महिन्यांची आहे. तसेच त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, करण ‘फायटर’ या चित्रपटामध्ये दिसून आला होता. यामध्ये त्याच्याबरोबर हृतिक रोशनदेखील मुख्य भूमिकेत होता. तसेच बिपाशा ही २०१८ पासून मनोरंजन क्षेत्रातून लांब आहे.