रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ऐश्वर्या राय व सलमान खानने गुपचूप केलं होतं लग्न, स्वतः अभिनेत्रीनेच केला होता खुलासा, म्हणालेली, “लग्नाची घोषणा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 16, 2024 | 1:05 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aishwarya Rai On Rumours with wedding salman khan

सलमान खानबरोबरच्या गुपचूप लग्नाच्या चर्चांवर अखेर ऐश्वर्या रायने सोडलं मौन, नात्याबद्दलही केला खुलासा

Aishwarya Rai On Rumours : बी-टाऊनमध्ये सलमान खान व ऐश्वर्या राय यांच्या अफेअरची खूप चर्चा होती. सलमान व ऐश्वर्याचे ब्रेकअप झाले असले तरी हे जोडपे एकमेकांच्या प्रेमात होते. त्यानंतर ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केले आणि संसार थाटला. या जोडप्याला आराध्या बच्चन ही एक मुलगी आहे. तर एकीकडे सलमान अजूनही सिंगल लाइफ एन्जॉय करत आहे. दरम्यान एकदा सलमान व ऐश्वर्याच्या गुपचूप लग्न केल्याच्या अफवा पसरल्या होत्या, त्यावर अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली होती. इंडस्ट्रीत सलमान खान व ऐश्वर्या राय यांनी गुपचूप लग्न केल्याची चर्चा होती. दोन्ही बाजूंनी याबाबत कोणतीही पुष्टी झाली नसली तरी, हे लग्न झाले असल्याचे अहवालात म्हटले आहे. लोणावळ्यातील एका बंगल्यात झालेल्या या लग्न सोहळ्याचे संचालन मुंबईतील एका काझी यांनी केले. लग्नासाठी ऐश्वर्याने इस्लाम धर्म स्वीकारल्याची अफवा पसरली होती, ज्याला तिच्या जवळच्या मित्रांनी हजेरी लावली होती.

सलमान व ऐशचे आई-वडील मात्र या लग्नाला उपस्थित नव्हते, असेही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. यानंतर अशा अफवा देखील पसरल्या की लग्नानंतर हे जोडपे त्यांच्या हनीमूनसाठी न्यूयॉर्कला गेले होते आणि मुंबईला परतताना ते एकत्र स्पॉटही झाले. अर्थात हे नाकारता येऊ शकत नाही की, ऐश्वर्याचे आई-वडील नेहमीच त्यांच्या मुलीचं सलमान खानबरोबर लग्न लावून देण्याच्या विरोधात होते आणि अफवांमुळे त्यांचा त्रास वाढला होता. याशिवाय ऐश्वर्या राय स्टारर चित्रपटांच्या निर्मात्यांना तिच्या लग्नाची बातमी कानावर येताच त्यांनादेखील चित्रपटाच्या भविष्याची चिंता वाटू लागली.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : आधी गावठी समजले, कमी लेखलं आता सूरज चव्हाणचं सगळेच करत आहेत कौतुक, वर्षा उसगांवकर म्हणाल्या, “छान खेळलास…”

View this post on Instagram

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb)

ऐश्वर्या राय व सलमान खानच्या गुपचूप लग्नाच्या अफवा वाऱ्यासारख्या पसरत असताना, अभिनेत्रीने शांतपणे हे सर्व प्रकरण फेटाळून लावले. मीडिया संवादादरम्यान, ऐशने ते सर्व वृत्त फेटाळून लावले आणि असं म्हटलं की, “जर हे घडले असते तर संपूर्ण इंडस्ट्रीला याची जाणीव झाली नसती का? इंडस्ट्री ही फार लहान आहे. शिवाय माझ्या आईच्या अपघातानंतर मला माझ्या कुटुंबीयांबरोबर एकत्र वेळही घालवता आला नाही. मी त्या लोकांपैकी नाही आहे ज्यांनी माझ्या लग्नाची घोषणा जगासमोर केली. असं असत तर मीच अभिमानाने हे लग्न झाल्याचं सर्वांसमोर सांगितलं असतं. पण तरीही, लग्न करायला वेळ कुठे आहे?”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : वैभवच्या मांडीवर पाय ठेऊन बसली इरिना, तर दुसरीकडे एकमेकांच्या अगदी जवळ आले अरबाज-निक्की, नक्की चाललंय काय?

दोघांचे ब्रेकअप झाल्यावर सलमान व ऐश्वर्याच्या लग्नाची स्वप्ने पाहणाऱ्या चाहत्यांना धक्काच बसला. ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत ऐश्वर्याने तिच्या नात्यातील समस्यांबद्दल सांगितले होते आणि सलमानबरोबर राहताना तिला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले तेदेखील सांगितले. तिने नमूद केले की, “तिच्या सर्वात वाईट वेळी तिने सलमानच्या मद्यपी गैरवर्तनाचा सामना केला आणि शाब्दिक, शारीरिक व भावनिक अत्याचार, अपमानही सहन केला. त्यामुळे तिने त्याच्याबरोबरचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला होता”.

Tags: Aishwarya On Secret Wedding Rumours With SalmanAishwarya Rai On Rumoursbollywood gossip
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Bigg Boss Marathi 5 update

Bigg Boss Marathi : वैभवने गेममध्ये टीमलाच दिला दगा, टास्कही नीट खेळला नाही अन्…; मराठी अभिनेत्रीने सुनावलं, म्हणाली, "त्याने मुद्दाम…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.