मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पाच वर्ष अफेअर अन् लग्नाच्या एका वर्षात गरोदर आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली, “बियरच्या बॉटल…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 16, 2024 | 4:51 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sonnalli Seygall Announces Pregnancy

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली सहगल होणार आई, इन्स्टाग्रामद्वारे खास पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

Sonnalli Seygall Announces Pregnancy :  काल स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत टेलिव्हिजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री गोपी बहू म्हणजेच देबोलिना भट्टाचार्जीने नुकतीच आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली. देबोलिनानंतर आता ‘प्यार का पंचनामा’ फेम अभिनेत्री सोनाली सहगलनेही लवकरच आई होणार असल्याची घोषणा केली आहे. अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना एका खास पद्धतीने सांगितली आहे. लग्नाच्या एका वर्षानंतर अभिनेत्रीने गरोदरपणाची घोषणा केली आहे. ही बातमी समजल्यानंतर सेलिब्रिटी व चाहते सोनालीचे अभिनंदन करत आहेत.

सोनाली सहगलने इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत आई होणार असल्याची आनंदाची बातमी दिली. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने तीन फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिचा बेबी बंप दिसत आहे. पहिल्या फोटोमध्ये काहीतरी खाताना दिसत आहे आणि तिच्या शेजारी तिचा नवरा त्याच्या तोंडात बिअरची बाटली आणि हातात बाळाच्या दुधाची बाटली धरुन बसलेला दिसत आहे. अभिनेत्रीच्या समोर बेडवर चिप्स, कुकीज व पुस्तके ठेवलेली आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : वैभवने गेममध्ये टीमलाच दिला दगा, टास्कही नीट खेळला नाही अन्…; मराठी अभिनेत्रीने सुनावलं, म्हणाली, “त्याने मुद्दाम…”

View this post on Instagram

A post shared by Sonnalli A Sajnani (@sonnalliseygall)

गरोदरपणाची घोषणा करताना सोनालीने कॅप्शन देत असे म्हटले आहे की, “बिअरच्या बाटल्यांपासून बाळाच्या बाटल्यांपर्यंत आशिषचे आयुष्य बदलणार आहे. जोपर्यंत माझा संबंध आहे, काही गोष्टी तशाच राहतात. पूर्वी मी एकटीसाठी खात होतो, आता मी दोघांसाठी खात आहे. दरम्यान, समशेर (सोनालीचा कुत्रा) चांगला मोठा भाऊ होण्यासाठी नोट्स काढत आहे. धन्य आहे आणि खूप आनंद झाला. कृपया प्रार्थना करा”. अभिनेत्रीने असेही सांगितले की, ती येत्या डिसेंबरमध्ये आई होईल.

आणखी वाचा – “खोटा, त्याचा साखरपुडा होऊनही…”, अरबाज खानच्या पूर्वाश्रमीच्या गर्लफ्रेंडचे धक्कादायक खुलासे, म्हणाली, “धर्म, जात वेगळी…”

सोनाली सहगल ७ जून २०२३ रोजी आशिष सजनानीसह लग्न केले. सोनाली व आशिष जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते. सोनालीने २०११ मध्ये ‘प्यार का पंचनामा’ मधून बॉलिवूड विश्वात पदार्पण केले. हा चित्रपट लव रंजन यांनी दिग्दर्शित केला होता. यानंतर सोनाली ‘प्यार का पंचनामा २’ मध्येही दिसली होती. अभिनेत्रीने ‘वेडिंग पुलाव’. सोनू के टिटू की स्विटी’, ‘बुंदी रायता’, ‘नुरानी चेहरा’, यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

Tags: Sonnalli SeygallSonnalli Seygall Announces PregnancySonnalli Seygall pregnent
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Bigg Boss Marathi 5 daily update yesterday's episode, Nikki refers to Aarya as a dog

Bigg Boss Marathi : "कुत्रीच आहे, हिची औकात…", आर्याला घाणेरड्या शब्दांत निक्कीने सुनावलं, मर्यादा ओलांडत तिच्या अंगावर पडली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.