रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लेक तीन महिन्यांची असताना हृदयाला दोन छिद्र, मोठी शस्त्रक्रिया अन्…; करण सिंग ग्रोवरने सांगितला ‘तो’ प्रसंग, अशी अवस्था झाली की…

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 16, 2024 | 4:16 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Karan singh grover on daughetr open heart surgry

करण सिंग ग्रोव्हर व बिपाशा बासु यांच्या मुलीच्या शस्त्रक्रियेवेळी अशी झाली होती अवस्था

अभिनेता करण सिंग ग्रोव्हर व बिपाशा बासु हे नेहमी चर्चेत असलेले दिसून येतात. २०१६ साली दोघंही लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्कादेखील बसला. त्यानंतर २०२२ साली बिपाशाने गोंडस मुलीलादेखील जन्म दिला. मुलीचे नाव त्यांनी देवी असे ठेवले. मात्र जन्मानंतर देवीच्या आरोग्याची अपडेट समोर आली होती. मुलीच्या  हृदयाला छेद असल्याने करण व बिपाशावर दुखाचा डोंगर कोसळला होता. केवळ तीन महिन्याच्या मुलीवर ओपन हार्ट सर्जरी करावी लागली होती. मात्र अशातही न डगमगता त्यांनी या प्रसंगाला खंबीरपणे तोंड दिले. (Karan singh grover on daughetr open heart surgery)

करण व बिपाशा त्यांच्या मुलीबरोबरचे अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. देवीला अनेकांची पसंतीदेखील मिळत असते. अशातच आता करणने दिलेली मुलाखत चर्चेत आली आहे. त्याने मुलीला फायटरदेखील म्हंटलं आहे. ‘दैनिक भास्कर’बरोबर बोलताना करणने सांगितलं की, “आयुष्यामध्ये खूप कठीण प्रसंग आले. पण मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. माझ्याबरोबर काहीही चुकीचं झालं नाही. पण जेव्हा माझ्या तीन महिन्याच्या मुलीच्या हृदयात दोन छिद्र आहेत हे समजलं तेव्हा आमच्या पायाखालची जमीन सरकली”.

आणखी वाचा- ऐश्वर्या राय व सलमान खानने गुपचूप केलं होतं लग्न, स्वतः अभिनेत्रीनेच केला होता खुलासा, म्हणालेली, “लग्नाची घोषणा…”

View this post on Instagram

A post shared by karan singh grover (@iamksgofficial)

पुढे तो म्हणाला की, “बिपाशासाठी देखील तो वाईट काळ होता. छोट्याश्या जिवाने जे काही सहन केलं आहे ते मी शब्दांत नाही सांगू शकत. देवीच्या छातीपासून पोटापर्यंत एक मोठी खूण आहे. मी व बिपाशाने खूप काही सहन केलं आहे. पण जे काही घडलं त्याला आम्ही दोघंही धीराने सामोरे गेलो”.

आणखी वाचा – ७०व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा, ‘कांतारा’ चित्रपटाने मारली बाजी, मराठीतील ‘वाळवी’ चित्रपटाला पुरस्कार, वाचा संपूर्ण यादी

बिपाशा व करण यांची ओळख ‘अलोन’ या चित्रपटादरम्यान झाली होती. यावेळी त्यांच्यामध्ये मैत्री झाली व मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २०२२ साली त्यांना मुलगी झाली. सध्या देवी एक वर्ष नऊ महिन्यांची आहे. तसेच त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, करण ‘फायटर’ या चित्रपटामध्ये दिसून आला होता. यामध्ये त्याच्याबरोबर हृतिक रोशनदेखील मुख्य भूमिकेत होता. तसेच बिपाशा ही २०१८ पासून मनोरंजन क्षेत्रातून लांब आहे.    

Tags: Bipasha Basudaughetr open heart surgerykaran singh grover
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Sonnalli Seygall Announces Pregnancy

पाच वर्ष अफेअर अन् लग्नाच्या एका वर्षात गरोदर आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली, "बियरच्या बॉटल…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.