सध्या मनोरंजन विश्वात लग्नसराई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. एकामागून एक अनेक कलाकार मंडळी आपल्या जोडीदाराबरोबर विवाहबंधनात अडकत आहेत. लोकप्रिय अभिनेत्री श्रीजिता डे तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. गेल्या महिन्यात बंगाली रितीरिवाजांनुसार तिचे लग्न झाले. वर्षभरातच त्यांनी पुन्हा एकदा बंगाली पद्धतीने लग्न केले आहेत. १० नोव्हेंबर रोजी, श्रीजिता आणि मायकेल यांनी गोव्यात मेहेंदी, हल्दी आणि संगीत यांसारख्या कार्यक्रमांसह लग्न करत केले. (Sreejitha de on trolling)
अलीकडेच श्रीजिताने मायकेलबरोबर घालवलेले क्षण जसे की मेहंदी आणि हळदीचे फोटो शेअर केले आहेत. श्रीजिताने शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाली. पण, एका गोष्टीमुळे मात्र तिला ट्रोल केलं गेलं होतं. श्रीजिताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने लाल रंगाच्या साडीत बंगाली लूक केला होता. तर तिच्या पतीने शेरवानी घातली होती. मात्र लग्नात सात फेरे घेताना तिच्या पतीने पायात बूट घातले होते. त्यामुळे चाहते नाराज झाले होते.
आणखी वाचा – सलमान खानच्या सहअभिनेत्रीचा गंभीर आजाराशी सामना, उभं राहणंही अशक्य, मदत मागितली नाही कारण…
अभिनेत्रीच्या या फोटोंवर कमेंट करत नेटकऱ्यांकडून तिला ट्रोल करण्यात आलं होतं. यावर आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्रीजिताने भाष्य केलं आहे. फिल्मीग्यानला दिलेल्या मुलाखतीत श्रीजिता म्हणाली, “जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा चप्पल बाहेर काढतो. पण, चर्चमध्ये जातो तेव्हा चप्पल काढत नाही. देव दोन्ही ठिकाणी आहे. अग्नी आणि सात फेरे याबाबत मनात आदर असला पाहिजे. कपडे आणि बूट यांवरुन आदर दिसत नाही.”
यापुढे ती म्हणाली की, “बंगाली लग्नांमध्ये शेरवानीही घातली जात नाही. धोतर नेसलं जातं. संस्कृतीचा आदर कपड्यांवरुन दाखवला जाऊ शकत नाही”. अभिनेत्रीच्या या वक्तव्यानंतरही तिला पुन्हा ट्रोल केलं जात आहे. दरम्यान, काही काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर श्रीजिता डे आणि मायकेल ब्लोहम पेप यांनी जुलै २०२३ मध्ये जर्मनीमध्ये लग्न केले. बिग बॉस १६च्या दरम्यान मायकेलने घरात फॅमिली वीकमध्ये एण्ट्री घेतली होती. या दोघांची जोडी सर्वांना खूप आवडली.