adish vaidya revati lele : अभिनेत्री रेवती लेले नुकतीच लग्नबंधनात अडकली. अभिनेत्रीने डिझायनर कौशिक भिडेसोबत लग्नगाठ बांधली. थेट लग्नविधीचे फोटो शेअर करत तिने लग्नाची गोड बातमी दिली. रेवतीच्या लग्नानंतर आता आदिशची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आदिश आणि रेवती यांची जोडी सोशल मीडियावर खूप चर्चेत असायची. रेवती लेले यापूर्वी मराठी अभिनेता आदिश वैद्यसोबत रिलेशनशिपमध्ये होती. जवळपास सहा वर्ष दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. अशातच रेवतीच्या लग्नाबाबत आदिशला त्याच्या पोस्टमध्ये एका चाहतीने विचारताच त्याने तिला सडेतोड उत्तर दिलं आहे.
आदिशने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्या एका हातात दुसरा हात दिसत असून त्या हातात स्क्रंची घातलेलं दिसत आहे. आणि या फोटोबरोबर आणखी एक फोटो असून त्यात दोन्ही हात आदिशचेच असल्याचं उघड होत आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्याने ‘मेरे हाथ मे, मेरा हाथ हो…सारी जन्नते मेरे साथ हो’ असं कॅप्शन लिहिलं आहे. या फोटोवर एका चाह्तीची कमेंट पाहून आदिश भडकला आहे.आदिशच्या फोटोवर एका चाहतीनं कमेंट करत, “तू रेवतीच्या लग्नाची खिल्ली उडवतोस का?”, असं विचारलं.
आणखी वाचा – युरोपियन स्टाईल प्रवेशद्वार, आलिशान फ्लॅट अन्…; ‘ठरलं तर…’ फेम दिगदर्शकाने घेतलं हक्काचं घर! व्हिडीओ समोर

आदिशने चाहतीच्या प्रश्नावर कमेंट करत असं म्हटलं की, “असा मूर्खासारखा प्रश्न तुम्ही का विचारत आहात? मी कोणाची खिल्ली उडवलेली नाही. हा जोक मी माझ्यावर केलेला आहे. तिला प्रेम मिळालं यासाठी मी आनंदी आहे. आणि ज्याला कोणाला आयुष्यात प्रेम मिळालं त्या सगळ्यांसाठी मी आनंदी आहे. पुढच्या वेळी बोलण्याआधी विचार करा”. यावर त्या चाहतीनं रिप्लाय करत लिहिलं की, “तुझी क्रिकेटची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती, म्हणून मला वाटलं”. आदिशने क्रिकेट खेळतानाची पोस्ट केली होती. ही पोस्ट शेअर करत आदिशने ‘तू खेळ बिनधास्त मी आहे तुझ्यासोबत, अशा मुलीसोबत लग्न करायचं आहे’ असं लिहिलं होतं.
रेवती लेले आणि आदिश वैद्य सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. २०२३ मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला आणि यामुळे चाहत्यांना धक्काच बसला. यावर, रेवतीनं मला काही बोलायचं नाही असं म्हणत प्रतिक्रिया दिली होती.





