बॉलिवूडमधील लाडका अभिनेता गोविंदाच्या बाबतीत एक नवीन अपडेट समोर आली आहे. त्याच्या पायाला मंगळवारी पहाटे बंदुकीची गोळी लागल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेमध्ये गोविंदा जखमी झाला असून त्याला तातडीने क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी आता जुहू पोलिसांनी त्याची बंदूक ताब्यात घेतली असून या प्रकरणाचा संपूर्ण तपास सुरु आहे. याबद्दलच्या अनेक पोस्ट सोशल मीडिया व्हायरल होतानादेखील दिसत आहेत. दरम्यान हा प्रकार नक्की कसा घडला याबद्दल तर्क-वितर्क मांडण्यात येत आहेत. (Govinda Hospitalized after Shooting Himself)
दरम्यान ही घटना समोर आल्यानंतर गोविंदा यांच्याकडे असलेल्या परवानाधारक पिस्तूलमधून चुकून गोळी सुटल्याची माहिती समोर आली आहे, मात्र ही घटना नेमकी कशी घडली याबाबत अनेक अंदाज बांधण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदा त्यांच्या घरी पिस्तूल साफ करत होते. त्यावेळी चुकून पिस्तूलचे ट्रीगर दाबले गेले आणि बंदुकीतील गोली गोविंदाच्या पायात घुसली.
दरम्यान गोविंदाची मुलगी टीना आहुजाने एबीपी न्यूजबरोबर संवाद साधला आहे. तिने सांगितले की, “मी आता बाबाबरोबर आयसीयूमध्ये हजर आहे. मी जास्त बोलू शकत नाही. पण आता त्यांची तब्येत पहिल्यापेक्षा चांगली आहे. गोळी लागल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून टोई यशस्वी झाली आहे. सर्व टेस्ट रिपोर्ट्सदेखील चांगले आले आहेत. बाबांना आता कमीत कमी 24 तास आयसीयूमध्ये ठेवतील त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये ठेवायचं की नाही? हे ठरवतील. डॉक्टर आता सतत त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहेत आणि ते लवकरच बरे होतील. घाबरण्यासारखं काहीच नाही. धन्यवाद”.
दरम्यान आता गोविंदाबरोबर नक्की काय झालंय? हे लवकरच समोर येईल. त्याचे सर्व चाहते तसेच बॉलिवूडमधील अनेक मंडळी तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.