तंत्रज्ञानामुळे सध्या काहीही शक्य आहे. सर्वत्र सध्या AIचं प्रस्थ वाढलं आहे. या तंत्रज्ञानाचा जितका फायदा आहे तितके त्याचे नुकसानदेखील आहे. याचा फाटका सगळ्याच क्षेत्रातील दिग्गजांना बसला आहे. सुरुवातीला डीपफेक व्हिडीओचं प्रमाण खूप जास्त झालं होतं. रश्मिका मंदना, आलिया भट्ट, कतरिना कैफ या अभिनेत्रीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याबद्दल सायबर क्राइम विभागाकडून दाखल घेत व्हिडीओ हटवण्यात आले. आशातच आता यामध्ये ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचादेखील समावेश झाला आहे. अनुपम यांचा फोटों ५०० रुपयांच्या नोटेवर छापण्यात आला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (anupam kher viral video)
अनुपम यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच या प्रकाराबद्दल चिंतादेखील व्यक्त केली आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ५०० रुपयांच्या नोटेवर त्यांचा फोटो दिसत आहे. या सगळ्या नोटा गुजरातमध्ये पकडल्या गेल्याचे समोर आले आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “हे बघा आता बोला. ५०० रुपयांच्या नोटेवर महात्मा गांधींऐवजी माझा फोटो? काहीही होऊ शकतं”.
आणखी वाचा – दोन आठवडे रितेश देशमुखचा भाऊचा धक्का झालाच नाही, पण यामागचं नेमकं कारण काय?
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कॉमेडियन संकेत भोसलेने आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच एका युजरने लिहिले की. “गुजरातमध्ये तुमचं स्वागत आहे”, तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “खूप अभिनंदन सर”, तिसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “डोक्यावर केस आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा सर नाहीतर गोंधळ वाढेल”. तसेच अजून एकाने लिहिले की, “थोडासाच फरक आहे”. दरम्यान अनुपम यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
अनुपम यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, त्यांचा चित्रपट ‘द सिग्नेचर’ ४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन के.सी. बोकाडिया व विनोद चौधरी यांनी केले आहे. याशिवाय ते कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटातही दिसणार आहेत. हा चित्रपट ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार होता मात्र प्रदर्शनासाठी समस्या आल्याने तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.