बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम चांगलाच प्रकाशझोतात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन करत आहेत. सध्या केबीसीचे १६ वे पर्व सुरु आहे. यावेळी अमिताभ यांनी आईच्या १७ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. शनिवारी बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगवर आईचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. तसेच या पोस्टवर नेटकऱ्यांनीदेखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. या पोस्टमध्ये अमिताभ यांनी काय लिहिले आहे? हे आपण आता जाणून घेऊया. (amitabh bachchan mother post)
अमिताभ यांनी पोस्ट शेअर करत लिहिले की, “आज २१ डिसेंबर : आठवणीत…माझ्या डोळ्यांच्या समोर, प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण”. अमिताभ यांनी आईचे दीर्घ आजाराने २१ डिसेंबर २००७ साली निधन झाले. मृत्यूसमयी त्या ९३ वर्षांच्या होत्या. २०१७ साली अमिताभ यांनी आईबरोबरच्या शेवटच्या प्रसंगाबद्दल भाष्य केले. त्यांनी लिहिले की, “त्यांची जगण्याशी लढाई सुरु होती. तिथे असणारे डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. पण आईचे हृदय साथ देत नव्हतं”.
T 5230 – माँ pic.twitter.com/6uueZRR5Ri
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 20, 2024
पुढे त्यांनी लिहिले की, “आईच्या छातीवर हात ठेऊन दिलेला PCR बघून मला खूप दु:ख होत होतं. मशीनने हार मानली होती. आईचे आयुष्य थोड्या वेळासाठी थांबले असते आणि ती परत येऊ शकली असती. आम्ही एकमेकांचा हात पकडून उभे राहिलो आणि आईला जाताना पाहिलं”.
अमिताभ नेहमी त्यांच्या मनातील गोष्ट ब्लॉगवर लिहिताना दिसतात. याआधी बीग बी यांनी अभिषेक व ऐश्वर्याच्या खासगी आयुष्यावर सुरु असणाऱ्या चर्चांवरदेखील भाष्य केले होते. त्यांनी लिहिले होते की, “मी कुटुंबाबद्दल जास्त काही बोलत असतो. हे माझं डोमेन आहे आणि याचा गोपनियतेची काळजी घेतली जाते. चर्चा होत राहतात आणि लोक अंदाज लावत बसतात”. अमिताभ यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.