बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला होता. या चित्रपटामध्ये त्याने खालनायकाची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला चाहत्यांची खूप पसंतीदेखील मिळाली होती. अशातच आता त्याने त्याच्या आयुष्यावर उघडपणे भाष्य केले आहे. २०११ साली त्याने ‘इश्कजादे’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री परिणीती चोप्रादेखील दिसून आली होती. त्यानंतरही तो अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसून आला होता. मात्र त्याला मनोरंजनसृष्टीमध्ये हव तसं नाव कमावता आलं नाही. त्याला अनेकदा ट्रोलदेखील केले गेले. यावरुन आता त्याने भाष्य केले आहे. तो नक्की काय म्हणाला ते जाणून घेऊया. (arjun kapoor on trolling)
अर्जुन नुकताच राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने ट्रोलिंगवर खुलेपणाने भाष्य केले. आयुष्यात अपयशी व्हावे असे अनेकांना वाटत असल्याचेही तो म्हणाला. याबद्दल तो म्हणाला की, “लोकांना वाटत होतं की मी अपयशी व्हावं. अनेकदा तर माझ्या आडनावावरुनही बोलले गेले. याशिवाय अनेकांनी माझ्या खासगी आयुष्याबद्दल आणि माझे जे चित्रपट चालले नाहीत याबद्दलही खूप चर्चा केली”.
अर्जुन पुढे म्हणाला की, “मी माझ्या कामाची चिंता नाही. अनेकजण तर मी अभिनय करण्याच्या लायकीचा नाही असंही म्हणतात. हे सगळं मी तेव्हा ऐकलं जेव्हा मी माझ्या करियरच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर होतो. माझ्या शारीरिक समस्यांना खूप वाढल्या होत्या. मी माझ्या आजाराबद्दलही अनेकदा भाष्य केले आहे. त्यावेळी अनेक टिकाकारांनी माझ्यावर भाष्य करणं योग्य समजलं”.
सध्या अर्जुनच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, त्याची एक्स गर्लफ्रेंड मलायकाबरोबर ब्रेकअपच्या चर्चा खूप रंगल्या होत्या. अर्जुन व मलायकाने २०१८ साली एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. २०१९ साली त्यांनी सोशल मीडियावर त्यांचं नातंदेखील स्वीकारलं होतं. दोघं अनेकदा पार्टीमध्ये, डिनरला, आऊटिंगदरम्यान दिसून यायचे. मात्र गेल्या काही काळापासून त्यांनी एकमेकांना भेटणं, एकमेकांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणं हे सगळं बंद केलं.