गुरूवार, सप्टेंबर 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“…आणि माझ्या आई-वडिलांची इच्छा पूर्ण झाली”, असं का म्हणाला अक्षय कुमार?, शेअर केलेली पोस्ट चर्चेत

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 15, 2023 | 1:32 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Akshay Kumar share a Photo

"...आणि माझ्या आई-वडिलांची इच्छा पूर्ण झाली", असं का म्हणाला अक्षय कुमार?, शेअर केलेली पोस्ट चर्चेत

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी त्याचा ‘OMG २’ चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. खरंतर, अक्षय कुमार वर्षभरात पाच ते सहा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतो. पण त्याच्या काही चित्रपटांचा अपवाद वगळता अन्य चित्रपटांना हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. अशातच आता खिलाडी कुमार आणखी दोन चित्रपट घेऊन येत आहे. ते म्हणजे ‘मिशन राणीगंज’ आणि ‘वेलकम टू द जंगल’. (Akshay Kumar share a Photo)

मागील वर्षाप्रमाणे यंदाही अक्षय त्याचे अनेक चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण ‘OMG २’ वगळता या सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे आता त्याच्या चाहत्यांना या दोन चित्रपटाकडून सर्वात जास्त अपेक्षा आहे. त्यातही ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना ‘मिशन राणीगंज’ चित्रपटाची मोठी उत्सुकता असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा फर्स्ट लुक समोर आला होता. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून ज्यामध्ये अक्षय जसवंत सिंग गिल यांची भूमिका साकारणार आहे. अभिनेत्याचा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

हे देखील वाचा – ‘OMG 2’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, शेवटचा डान्स व्हिडीओ व्हायरल, चाहतेही हळहळले

दरम्यान, आज देशभरात इंजिनिअर्स डे साजरा होत आहे. त्यानिमित्त अक्षयची सोशल मीडियावरील एक पोस्ट चर्चेत आली आहे. अक्षय चित्रपटात ज्यांची भूमिका साकारणार आहेत, त्या जसवंत सिंग गिल यांचा एक फोटो त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोबरोबर तो त्याच्या चाहत्यांना इंजिनिअर्स डेच्या शुभेच्छा देताना म्हणतो की, “मी स्वप्नातही विचार करू शकत नाही, की मला इंजिनिअरिंगचा कठोर अभ्यास करावा लागेल. पण यानिमित्ताने मला जसवंत सिंग गिलजी सारख्या धाडसी व हुशार अभियंत्याची भूमिका करण्याची मला संधी मिळाली. शेवटी आई-वडिलांची इच्छा पूर्ण झाली.”

हे देखील वाचा – मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओनंतर किशोर कदम आक्रमक, म्हणाले, “वचनं देऊन निघून जायचं…”

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे आपली पसंती दर्शवली आहे. अक्षय कुमारचा हा चित्रपट राणीगंज येशील कोळशाच्या खाणीशी संदर्भात असून त्यात गिल यांनी त्या कोल माईनमधील रेस्क्यु ऑपरेशनमध्ये महत्वाची भूमिका निभावली होती. येत्या सहा ऑक्टोबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Tags: akshay kumarbollywood movieinstagram postmission raniganj
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Vidya Balan talks about Body Shaming

"मसाज करणाऱ्या बाईने मला…", वाढत्या वजनावरुन हिणावल्यानंतर रडू लागली विद्या बालन, म्हणाली, "माझ्या शरीराबाबत…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.