मंगळवार, जून 3, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अक्षय कुमारच्या लेकीला कुत्रा चावला अन्…; बायकोने सांगितला ‘तो’ थक्क करणारा प्रसंग, म्हणाली, “त्याने…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 30, 2024 | 11:21 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bollywood actor Akshay kumar and actress twinkle khanna daughter nitara was bitten by dog see the details

अक्षय कुमारच्या लेकीला कुत्रा चावला अन्...; बायकोने सांगितला ‘तो’ थक्क करणारा प्रसंग, म्हणाली, “त्याने...”

‘बॉलिवूडचा खिलाडी’ म्हणून मनोरंजन विश्वात लोकप्रिय असणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. अक्षय कुमार हा त्याच्या अभिनयाने कायमच प्रेक्षकांची मनं जिंकत आला आहे. उमेदीच्या काळापसून ते आतापर्यंत त्याने अनेक उतमोत्तम चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. अभिनेत्याने आजवर त्यांच्या अभिनयासह लाघवी स्वभावानेदेखील अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे आणि त्याचा हा स्वभाव साहजिकच त्याच्या मुलांमध्येदेखील उतरला आहे.

त्याचं झालं असं की, काही दिवसांपूर्वी एका पाळीव कुत्र्याने अक्षय कुमारच्या लहान मुलीच्या हाताचा जोरदार चावा घेतला. पण तरीही अक्षयच्या मुलीने तो केवळ एक अपघात होता असं म्हणत तिची भूतदया, प्राण्यांवर असलेले प्रेम व्यक्त केलं आहे. याचा खुलासा स्वत: अक्षयच्या पत्नीने म्हणजेच अभिनेत्री ट्विंकल खन्नाने केला आहे. ट्विंकल खन्ना ही सध्या मनोरंजन सृष्टीत अभिनेत्री म्हणून कार्यरत नसली तरी ती सध्या लेखिका म्हणून काम करत आहे. ती काही वर्तमानपत्र व मासिकांसाठी स्तंभलेखनही करते.    

आणखी वाचा – Video : सहा दिवसांच्या अंदमान टूरनंतर प्रथमेशच्या भेटीसाठी मुग्धाची लगबग, कुटुंबियांसाठी खास भेटवस्तू आणल्या अन्…

नुकतंच एका मुलाखतीत ट्विंकलने ख्रिसमसच्या सुट्टीत मुलगी निताराच्या दोन्ही हातांना त्यांच्या पाळीव कुत्र्याने चावल्याचे सांगितले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’साठी लिहिलेल्या स्तंभामध्ये, अभिनेत्रीने तिच्या चुलत भावाचा पाळीव कुत्रा फ्रेडी व तिच्या मुलीमध्ये असलेल्या छान नात्याविषयी सांगितलं. निताराला पाळीव प्राणी खूप आवडत असून कुत्र्यांवर तिचे विशेष प्रेम असल्याचे  ट्विंकलने सांगितले.

आणखी वाचा –  …अन् ते प्रकरण भोवलं! अखेर ‘त्या’ वक्तव्यावरुन पुष्कर जोगने BMC कर्मचाऱ्यांची मागितली माफी

ट्विंकलने या संपूर्ण घटनेचं वर्णन करत असं म्हटलं की, “या ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये, फ्रेडी जवळपास असताना कोणीतरी चुकून मुलांसमोर चिकनची प्लेट ठेवली होती. त्याने प्लेटवर उडी मारली आणि ते खायला सुरुवात केली. माझ्या ११ वर्षाच्या मुलीला भीती वाटत होती की फ्रेडी लाकडासह चिकन गिळून टाकेल. त्याने ते बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होती. पण त्यादरम्यान त्याने निताराचे दोन्ही हात चावले.” यापुढे ती असं म्हणाली की, “तीन रेबीज व एक टिटॅनसचं इंजेक्शन मिळाल्यानंतरही निताराने तिच्या पाळीव कुत्र्याचीच बाजू घेतली आणि घडलेल्या घटनेला निव्वळ ‘अपघात’ म्हटले.”  

Tags: akshay kumarbollywood actorbollywood actressBollywood entertainment newsbollywood newsentertainment newstwinkle khannaअक्षय कुमारट्विंकल खन्नाबॉलिवूड अभिनेताबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड बातमीमनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

seema kapoor torchered by own mother
Entertainment

आईकडून मारहाण, टॉर्चर अन् हाल; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला वाईट काळ, जन्मदातीच वैरी ठरली तेव्हा…

जून 2, 2025 | 7:00 pm
Premachi Goshta fame Swarda Thigales car accident
Entertainment

‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्ताचा अपघात, गाडी चालवताना झोप लागली अन्…; अभिनेत्रीचं मोठं नुकसान

जून 2, 2025 | 5:58 pm
Vaishnavi Hagawane Death
Entertainment

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ कोणाजवळच राहीना, आईविना लेकराचे रडून-रडून हाल, हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

जून 2, 2025 | 5:00 pm
Radhika Apte Motherhood
Entertainment

बाळ होण्याच्या एक दिवस आधीपर्यंत केलं काम, अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतील सत्य, म्हणाली, “इथं काम करणं…”

जून 2, 2025 | 3:30 pm
Next Post
Kiran Mane Post

"जोग कानाखाली मारताना…", पुष्कर जोग व केतकी चितळेच्या जातीवादावरील विधानावरुन मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला, "जातीला कमी लेखणं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.