बॉलिवूडमधील आघाडीच्या कलाकारांमध्ये अजय देवगणचं नाव घेतलं जातं. १९९१ साली त्याने ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तो नेहमी आपल्याला गंभीर भूमिकांमध्ये पाहायला मिळतो. तसेच अनेकदा तो विनोदी भूमिकांमध्येही पाहायला मिळाला आहे. त्याच्या विनोदी भूमिकेचेही प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. इतकी वर्ष अभिनय क्षेत्रात असल्याने त्याच्या अनेक सवयी, त्याचे किस्से हे प्रेक्षकांसमोर येत असतात. अशातच त्याच्याबद्दलचा एक नवीन किस्सा समोर आला आहे. तो सेटवर अनेक कलाकारांची मस्करी करत असतो. पण त्याने केलेल्या मस्करीमुळे एका महिलेवर आत्महत्या करण्याची वेळ आली होती. (Ajay devgan on co-actor wife suicide)
अजय हा चित्रपटांमध्ये गंभीर भूमिका करताना दिसतो. मात्र तो सेटवर आपल्या सहकलाकारांबरोबर मजामस्तीही करत असतो. पण त्याच्या मस्करी करण्याचा परिणाम त्याला भोगावा लागला होता. त्याने त्याच्या सहकलाकाराच्या पत्नीबरोबर मस्करी केली होती त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
याबाबत अजयने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “मी केलेल्या मस्करीचा खूप वाईट परिणाम झाला होता. माझ्या सहकलाकाराची पत्नी छोट्या गावातून आली होती. तिला फिल्म इंडस्ट्रीबद्दल इतकी माहिती नव्हती. त्यामुळे मी तिच्या पत्नीचे अफेअर सुरु असल्याचे सांगितले आणि रात्री कोणतेही शूट नसल्याचे सांगत असे”.
पुढे तो म्हणाला की, “काही वर्षांपूर्वी आम्ही शूट करण्यासाठी बाहेर जायचो. सह-कलाकाराचे नुकतेच लग्न झाले होते. तो त्याच्या पत्नीला घेऊन आला होता. तिला या क्षेत्राबद्दल काहीही माहिती नव्हती. त्यामुळे आम्ही तिला तिच्या नवऱ्याचे बाहेर अफेअर असल्याचे सांगायचो. तसेच रात्री कोणतेही शूट नसून तो इतर ठिकाणी जात असल्याचेही सांगितले.माझे शूट संपवून मी रात्री १०.३० वाजेपर्यंत माझ्या खोलीवर येतो असेही सांगत असे”.तसेच त्याने सांगितले की, “माझा मस्करी करण्याचा स्वभाव आहे हे तिला माहीत असल्याने ती माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत नसे. आठ दिवस हे असंच सुरु राहिलं आणि नवव्या दिवशी तिने गोळ्या घेतल्या असून तिला रुग्णालयात दाखल केल्याचे समजले”.
दरम्याने अजयने केलेली मस्करी समजल्यानंतर त्याच्यावर खूप टिका करण्यात आली. एका नेटकाऱ्याने लिहिले की, “खूप मोठे काहीतरी पराक्रम केल्यासारखे हा सांगत आहे. कधीकधी वाईट परिणाम होण्यापेक्षा थांबलेले बरे असते”. काही नेटकऱ्यांनी ही वीर दासची पत्नी असल्याचा अंदाज बांधला आहे. दरम्यान अजयच्या मस्करीमुळे त्याला खूप वाईट परिणामांना समाओरए जावे लागले होते.
अजयच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘मैदान’ व ‘सिंघम अगेन’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.