सध्या अभिनेता आमिर खान खूप चर्चेत आहे. आमिरने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या चित्रपटांना चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे. अभिनयाबरोबरच तो निर्माता व दिग्दर्शकही आहे. सध्या त्याचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट आता चर्चेत आला आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर जिनिलीया व दर्शील सफारी दिसून येणार अशी माहितीदेखील समोर आली आहे. ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाचा हा सीक्वल आसल्याचेदेखील बोलले आहे. याआधी त्याच्या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती असणारा ‘लापता लेडिज’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला होता. या चित्रपटाला ऑस्करमध्येदेखील एंट्री मिळाली होती. मात्र आमीर खानने त्याच्या ड्रीम प्रोजेक्टबद्दल सांगितले आहे. (aamir khan on mahabharat)
आमिरने ‘बीबीसी न्यूज’बरोबर संवाद साधला त्यावेळी त्याने अनेक खुलासे केले होते. आमिरला विचारले की, “येणाऱ्या वर्षात लक्ष्य काय आहे?”, त्यावर आमिर म्हणाला की, “मला खरच खूप चित्रपट बनवायचे आहेत. हुशार लोकांना संधी द्यायची आहे. मी अभिनय सुरुच ठेवणार आहे. मी एक अभिनेता म्हणून दोन-तीन वर्षात एक चित्रपट करतो. पण येत्या १० वर्षात मी प्रत्येक वर्षी एक चित्रपट करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी माझ्या आवडीच्या गोष्टींवर चित्रपटांची निर्मिती करायची आहे”.
आमिरने ड्रीम प्रोजेक्ट ‘महाभारत’बद्दलदेखील भाष्य केले आहे. तो म्हणाला की, “हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मला भीतीदेखील वाटते. इतका मोठा प्रोजेक्ट आहे आणि त्यामध्ये काही चुका होण्याची भीती वाटते. ही एक मोठी जबाबदारी आहे. कारण भारतीय म्हणून हा विषय आमच्या खूप जवळचा आहे. हे आमच्या रक्तात आहे. त्यामुळे हे मला योग्य प्रकारे करायचं आहे. प्रत्येक भारतीयाची मान गर्वाने उंचावली पाहिजे. भारताकडे काय आहे? हे मला जगाला दाखवून द्यायचे आहे. हे होणार की नाही? हे मला माहीत नाही. पण मला यावर काम करायचे आहे”.
आमिर याआधी ‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटात दिसून आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला होता. या चित्रपटानंतर आमिरने अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला, या चित्रपटानंतर आमिर नैराश्य आल्याचेही करीना कपूरने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.