बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या खूप चर्चेत असलेला मिळत आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याने काही निवडकच चित्रपट केले मात्र त्याच्या सर्वच चित्रपटांना खूप पसंती मिळाली. परंतु तो व्यावसायिक आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आला. काही महिन्यांपूर्वी त्याने दुसऱ्यांदा घटस्फोट घेतला. किरण रावबरोबर घेतलेल्या घटस्फोटामुळे त्याच्याबद्दल मोठया प्रमाणात चर्चादेखील झाली. त्यानंतर तो तिसरं लग्न करणार अशा अफवादेखील सुरु झाल्या होत्या. मात्र या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचे सांगितले होते. मात्र आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. (aamir khan home)
आमिरबद्दलची एक नवीन अपडेट समोर आली आहे. यामध्ये त्याचे मुंबई येथील पाली हिल परिसरातील घर आहे त्यावर बुलडोझर चालणार आहे. त्याच्या या घराचे नूतनीकरण केले जाणार आहे. २०२३ पासून याबद्दल योजना आखली जात आहे. त्याबद्दल आता घराचे काम सुरु झाले आहे. याबद्दल आता सविस्तर माहिती समोर आली आहे. आमिर ज्या इमारतीमध्ये राहत आहे त्या इमारतीमध्ये एकूण २४ घरं आहेत. त्यातील ९ फ्लॅट आमिरचे आहेत. मात्र ही इमारत ४० वर्ष जुनी आहे. त्यामुळे इमारतीचे नूतणीकरण करण्यात येणार आहे. या सोसायटीची Atmosphere Realty बरोबर पार्टनरशिप आहे.
या नूतणीकरणासाठी आमिर पूर्णपणे सहभागी झाला आहे. नवीन प्लॅनमध्ये तिथे राहणाऱ्या नागरिकांना ५५ ते ६० टक्केपेक्षा जास्त क्षेत्रफळ मिळण्याची आशा आहे. या इमारतीच्या नूतणीकरणासाठी तब्बल ८० हजार ते १,२५,००० स्क्वेअरफूट खर्च येण्याची शक्यता आहे. मात्र आमिर आता नक्की कुठे राहायला जाणार? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.
दरम्यान आमिरच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, तो शेवटचा ‘लालसिंह चढ्ढा’ या चित्रपटात दिसून आला होता. यामध्ये करीना कपूर मुख्य भूमिकेत होती. हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ या चित्रपटाचा हा अधिकृत रिमेक होता. त्यानंतर त्याने ‘लापता लेडिज’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्याचा आता ‘सितारे जमीन पर’ चित्रपट समोर येत आहे. ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाचा हा सीक्वल आहे.