सध्या ‘बिग बॉस मराठी’चे पाचवं पर्व सुरु आहे. यामधील एक स्पर्धक अरबाज पटेल हा चांगलाच चर्चेत आला आहे. अरबाज त्याच्या लूकमुळेदेखील अधिक चर्चेत आला होता. ‘बिग बॉस…’मध्ये येण्याआधी तो स्प्लिट्सविलामध्ये दिसून आला होता. अशातच काही दिवसांपूर्वी त्याची गर्लफ्रेंड लिजा बिंद्रादेखील चर्चेत आली होती. ‘बिग बॉस..’मध्ये निक्की तांबोळीबरोबर असलेल्या जवळीकीमुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. अशातच त्याच्या गर्लफ्रेंडने केलेल्या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (arbaz patel girlfriend post)
‘बिग बॉस…’च्या घरात पाहिल्याच दिवसापासून निक्की व अरबाजमध्ये जवळीक पाहायला मिळाली होती. मात्र एका एपिसोडमध्ये त्याने खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला होता. यामध्ये त्याने रिलेशनशिपमध्ये असल्याचे कबूल केले होते. हा खुलासा केल्याने घरातील मंडळी तसेच प्रेक्षकांनादेखील आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता. ‘बिग बॉस’च्या घरात जाण्याआधी त्याने गर्लफ्रेंडबद्दल सांगितले होते. तिचे नाव लिझा असून सोशल मीडियावर ती अधिक सक्रिय असल्याचेदेखील पाहायला मिळते. त्यांचे अनेक एकत्रित व्हिडीओदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट केली होती. यामध्ये तिने अरबाजबद्दल कोणतेही प्रश्न विचारु नका असे म्हणाली होती. या सगळ्यांचा खूप त्रास होतो असेही ती म्हणाली होती. अशातच आता तिने एक मोठा निर्णय घेतला आहे. याबद्दल तिने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. एक सेल्फी पोस्ट करत लिहिले की, “मी काही काळापासून सोशल मीडिया सोडत आहे. सर्वांना प्रेम, हसत राहा”. लिझाच्या या पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
लिझाची पोस्ट व्हायरल होताच नेटकऱ्यांनीदेखील त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “दुसऱ्यांमुळे स्वतःचे नुकसान करु नकोस”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “तू कोणत्या त्रासातून जात आहेस हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे प्लीज सोशल मीडिया सोडू नकोस”, तसेच अजून एकाने लिहिले आहे की, “’बिग बॉस मराठी मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून जा”, या सर्व प्रतिक्रियांमुळे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.