‘बिग बॉस १८’ मध्ये सध्या खूप ड्रामा बघायला मिळत आहे. पहिल्याच आठवड्यात चाहत पांडे, मुस्कान बामणे, गुणरत्न सदावर्ते, करणवीर मेहरा व अविनाश मेहरा हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यामुळे गुणरत्न यांनी घरात राडा केला असून सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्याबरोबरच घरातील अनेक सदस्यदेखील खूप चर्चेत राहिले आहेत. अभिनेता करणवीर मेहरादेखील सहभागी झाला आहे. तो त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेही अधिक चर्चेत राहिला आहे. अशातच आता करणवीर च्या नात्याबद्दल घरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु होती. यावेळी तिथे सडस्यांमध्ये नक्की काय बोलणं झालं आणि करणने त्यावर काय उत्तर दिलं? हे जाणून घेऊया. (karanveer mehra on afreen khan)
‘बिग बॉस’ या नवीन पर्वात करण वीर, शिल्पा शिरोडकर, मुस्कान बामणे व चाहत पांडे टेबलवर बसले होते. यावेळी मुस्कानने नवरा कसा हवा? याबद्दल ती सांगताना दिसत आहे. यावेळी चाहत म्हणाली की, “तुम्ही कोणी मुलगा आमच्यासाठी बघू शकता का? त्यावेळी करण आरफीनकडे बघून बोलतो की, “माझ्या नजरेत खूप चांगली मुलं आहेत. पण काहींचे लग्न झाले आहे तर काही अडकले आहेत. पण हरकत नाही मी प्रयत्न करेन”.
यावेळी आरफीन त्याची पत्नी साराच्या जवळ जाऊन बसतो. सारा करणला विचारते की, “तुम्ही आरफीनकडे बघून काही बोललात का?”, त्यावर करण म्हणतो की, “हा तर सुंदर मुलगा आहे. मी म्हणालो की माझे मित्र यामध्ये अडकले आहेत त्यांना मी यातून बाहेर काढेन”.
दरम्यान याचवेळी करण व आरफीन यांच्यामध्येदेखील वाद झालेले पाहायला मिळतात. करण आरफीनला बायकोच्या धर्मांतरावरुनही सुनावलं आहे. तो म्हणाला की, “आरफीन नेहमी स्वतःचे मत मांडतो. बालपणीचे काही वाईट क्षण किंवा आईवडील यामुळे लग्नदेखील मोडू शकतं असंदेखील तो म्हणतो. पण मीदेखील आरफीनबद्दल काहीही बोलू शकतो. यांना असं वाटत की यांचं सगळेच ऐकतात. पण आरफीनने दुसऱ्या धर्मात लग्न केलं आणि बायकोला धर्मांतर करण्यास भाग पाडलं असंही मी म्हणू शकतो”. दरम्यान करणच्या वक्तव्यावर आरफीन भडकला आणि म्हणाला, “मी माझ्या बायकोला धर्म बदलायला लावला नाही”. दरम्यान हा वाद खूप वाढला.