Kajol Durga Puja Video Viral : बॉलिवूड अभिनेत्री काजोल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. बरं पण यावेळी काजल तिच्या चित्रपटामुळे किंवा कोणत्याही प्रोजेक्टमुळे नाही तर तिच्या रागामुळे चर्चेत आली आहे. तिचे अनेक व्हिडीओ सध्या समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये ती कधी रागावलेली तर कधी चिडलेली दिसत होती. पण आता तिचा असा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती दुर्गा पूजा पंडालमध्ये मुलीला व भाविकांना जेवण देताना आणि ते स्वतः जेवताना दिसत आहेत. जेव्हा एका व्यक्तीने काजोलचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली तेव्हा अभिनेत्रीने लगेच कॅमेरा बंद केला. इतकंच नाही तर काजोलचे अंगरक्षकही कृतीत उतरले.
हा व्हिडीओ नॉर्थ बॉम्बे सरबोजनिन दुर्गा पंडालचा आहे. हे पंडाल काजोल, राणी मुखर्जी आणि तिचे कुटुंब एकत्र चालवतात. येथे सर्व भक्तांना भोग दिले जातात आणि माँ दुर्गेचे स्वागत केले जाते. दरवर्षी हा दुर्गा पंडाल ट्यूलिप स्टार हॉटेलमध्ये उभारला जात होता, मात्र आता तो एसएनडीटी विद्यापीठ, जुहूच्या मैदानावर हलवण्यात आला आहे.
काजोल नुकतीच या दुर्गा पंडालमध्ये स्वतःच्या हातांनी भक्तांना भोग देत होती. शिवाय ती स्वतः काहीतरी खात होती. यावेळी अभिनेत्रीचे तोंड सतत हलत होते. जेव्हा एका भक्ताने आपल्या फोनने तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली तेव्हा काजोलने लगेच त्याला थांबवले आणि कॅमेरा बंद केला. कॅमेरा बंद करताना काजोल तिच्या तोंडाकडे बोट दाखवत काहीतरी खात असल्याचे सांगत होती. यावेळी काजोलचा अंगरक्षकही तेथे पोहोचला आणि त्याने त्या व्यक्तीला व्हिडीओ रेकॉर्ड करण्यापासून रोखले. त्याने त्या व्यक्तीला खडसावले आणि इतरांना व्हिडीओ बनवण्यासही मनाई केली
काजोलच्या या व्हिडीओवर लोकांकडून अनेक कमेंट येत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, “काजोलकडून आजकाल खूप नकारात्मक ऊर्जा येत आहे”. दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, “तिच्या चेहऱ्यावरचा दृष्टीकोन पाहा, लोकांना ती कशी आवडते ते मला माहित नाही”. आणखी एका युजरने लिहिले की, “खरंच, लोकांची सेवा करताना ती स्वत: का खात आहे?”. तर आणखी एकाने असं म्हटलं आहे की, “हे खूप वाईट होते. अशा बाईच्या हातून मी कधीच काही खाणार नाही”.