शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg boss 18 : गुणरत्न सदावर्तेंनी जेवण सोडलं, पहिल्या नॉमिनेशन टास्कसाठी राडा, कोण जाणार घराबाहेर?

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 9, 2024 | 1:32 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
bigg boss 18 new promo

गुणरत्न सदवर्ते यांची 'बिग बॉस' मध्ये सदस्याबरोबर शाब्दिक वादावादी

हिंदी टेलिव्हिजन शो ‘बिग बॉस’चे नवीन पर्व नुकतेच सुरु झाले आहे. मनोरंजन तसेच इतर क्षेत्रातील अनेक दिग्गज या पर्वामध्ये सहभागी झाले आहेत. सध्या पाहिलाच आठवडा सुरु आहे. पण पहिल्या दिवसांपासूनच यामध्ये वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळाली. अशातच आता नॉमिनेशनचा टास्क सुरु झाला आहे. यादरम्यान विवयन दसेना व चाहत पांडे यांच्यामध्ये वाद पाहायला मिळणार आहे तर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तुरुंगात जाण्यास नकार देणार असून ते अन्न-पाण्याचा त्यागणार असल्याचेखील समोर आले आहे. हा प्रोमो समोर आल्यानंतर एकच चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता ‘बिग बॉस’मध्ये काय पाहायला मिळणार? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. (bigg boss 18 new promo)

‘बिग बॉस १८’चा एक प्रोमो समोर आला आहे. यामध्ये या पर्वाचा पहिला नॉमिनेशन टास्क होणार आहे. यावेळी एका बोर्डवर फोटो लावलेले असतात आणि त्यावर धनुष्यबाण मारायचा असतो. यावेळी करणवीर मेहरा गुणरत्न यांच्या फोटोवर बाण मारतो आणि म्हणतो की, “यांचा गेम वेगळा आहे. ते काय करतात हे समजत नाही”, त्यावर गुणरत्नदेखील करणवीरला नॉमिनेट करतात आणि म्हणतात की मी याला ओळखत नाही”. दरम्यान दोघांमध्येही शाब्दिक वादावादी झालेली पाहायला मिळते.

आणखी वाचा – “त्याला वोट करणारे फार वाईट आणि…”, सूरजच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य, म्हणाली, “छपरी ट्रोलर्स…”

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

 यानंतर चाहत पांडेदेखील विवियनला नॉमिनेट करते आणि म्हणते की, “विवियन खूप गर्विष्ठ आहे”, हे ऐकून विवियन म्हणतो की, “गर्व तेव्हाच  येतो जेव्हा समोरचा चुकीच्या पद्धतीने बोलत असतो”. यानंतर या दोघांमध्येही खूप वाद होतात.

आणखी वाचा – “त्यांनी मला खूप जीव लावला आणि…”, पॅडी दादांना कधीच विसरणार नाही सूरज चव्हाण, म्हणाला, “माझ्या वडिलांसारखंच…”

तसेच या प्रोमोमध्ये दाखवले आहे की, करण, ईशा व अविनाशला एक विशेष अधिकार मिळतो. हे तिघंही जो सदस्य निवडतील तो तुरुंगात राहील. करणने गुणरत्न यांचे नाव घेतले पण त्यांना ते मान्य नव्हते. ते याला नकार देतात आणि खूप चिडलेलेदेखील दिसत आहेत. दरम्यान आता या टास्कमध्ये काय होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच कोणता सदस्य काय पाऊल उचलणार? हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे.   

Tags: bigg bossBigg Boss 18gunratna sadawarte
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
Next Post
Bigg Boss Marathi 5 winner Suraj Chavan went to Modhve village with the trophy and the villagers gave him a warm welcome video viral

Video : मिरवणूक, भेटण्यासाठी तुफान गर्दी अन्…; सूरज चव्हाणचं गावात झापुक झुपूक स्टाईल स्वागत, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.