Bigg Boss Season 17 Grand Finale Updates : बिग बॉस १७’ या वादग्रस्त रिऍलिटी शोने साऱ्यांना वेड करून सोडलं. ‘बिग बॉस १७’चं हे पर्व अगदी शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलं आहे. महाअंतिम सोहळ्याला सुरुवात झाली असून एकापेक्षा एक धमाकेदार परफॉर्मन्स या एपिसोडमध्ये सादर होताना दिसत आहेत. ‘बिग बॉस १७’च्या फायनलिस्टबद्दल बोलायचे झाल्यास मुन्नवर फारुकी, अंकिता लोखंडे, अरुण माशेट्टी, अभिषेक कुमार व मन्नारा चोप्रा हे स्पर्धक टॉप ५ आहेत. दरम्यान आतापर्यंत यांच्यापैकी २ स्पर्धकांचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला आहे. तर ‘बिग बॉस १७’च्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार हे लवकरच स्पष्ट होईल.
‘बिग बॉस १७’चा महाअंतिम सोहळा रंगतदार झाला असून यंदाच्या पर्वाच्या विजेत्याची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच ‘बिग बॉस’च्या यंदाच्या पाच स्पर्धकांमध्ये एलिमिनेशन राउंडला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. नुकताच या पाच स्पर्धकांपैकी एका स्पर्धकाचा प्रवास संपला असल्याचं समोर आलं. हैदराबादची शान अरुण माशेट्टी हा नॉमिनेट झालेला पहिला स्पर्धक ठरला. अरुण पाठोपाठ आता आणखी एका स्पर्धकाचा या घरातील प्रवास संपला आहे.
आजवर ‘बिग बॉस १७’ हे पर्व ज्या अभिनेत्रीमुळे चर्चेत राहील ते सेलिब्रिटी कपल म्हणजे अंकिता लोखंडे व विकी जैन. अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्यातील वादामुळे हे पर्व चांगलंच गाजलं. दरम्यान विकी जैनचा या पर्वातील प्रवास आधीच संपला होता. यापाठोपाठ आता अंकिता लोखंडेही घराबाहेर पडली आहे. अंकिता लोखंडेचा ‘बिग बॉस’च्या या पर्वातील प्रवास इथेच संपला आहे. अंकिताने आजवर स्वमेहनतीने व स्वखेळीने ‘बिग बॉस’च्या घरात आपले स्थान टिकवून ठेवले.
आता उर्वरित तीन स्पर्धकांपैकी कोणते दोन स्पर्धक टॉप २ मध्ये जाणार, त्यापैकी कोणता स्पर्धक ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर नाव कोरणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीची झलकही समोर आली आहे. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवरील डिझाईनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘बिग बॉस १७’ ची ट्रॉफी पूर्णपणे ‘दिल दिमाग, दम’ या शोच्या थीमचीला लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. या शोमधील तीन खोल्या व ‘बिग बॉस’च्या घराचे सार ट्रॉफीमध्ये पाहायला मिळत आहे. या ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर आता कोणता स्पर्धक नाव लिहिणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.