सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 Grand Finale : मनारा चोप्राचा प्रवास अखेर संपला, ‘बिग बॉस १७’मधून तिसरी स्पर्धक घराबाहेर, आता अंतिम निकालाची उत्सुकता

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 29, 2024 | 12:24 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss 17 Grand Finale Updates Mannara Chopra evicted from the show

मनारा चोप्राचा प्रवास अखेर संपला, 'बिग बॉस १७'मधून तिसरी स्पर्धक घराबाहेर, आता अंतिम निकालाची उत्सुकता

गेल्या अनेक दिवसांपासून सर्वत्र ‘बिग बॉस १७’ची क्रेझ पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस १७’ मधील अनेक ट्विस्ट्समुळे या शोची लोकप्रियता चांगलीच वाढली होती. आज (२८ जानेवारी) रोजी ‘बिग बॉस १७’चा महाअंतिम सोहळा पार पडत असून आज या पर्वाचा महाविजेता ठरणार आहे. अशातच घरातील मनारा चोप्राचा प्रवास संपला आहे.

‘बिग बॉस’च्या घरात मनारा चोप्राचा प्रवास सुरुवातीपासूनच खूप रंजक ठरला आहे. घरात आल्यापासूनच तिने सगळ्यांच्या मनावर राज्य केले. मनारा ही सुरुवातीपासूनच घरात सर्वात चांगली कामगिरी पार पाडत होती. घरातील प्रत्येक खेळ मोठ्या शिताफीने खेळत तिने घरातील स्पर्धकांसह प्रेक्षकांनादेखील स्वत:कडे आकर्षित केले. पण ‘बिग बॉस’च्या या अंतिम टप्प्यावर तिचा प्रवास अखेर संपला आहे.

आणखी वाचा – Bigg Boss 17 Grand Finale : टॉप ५ पैकी पहिला नॉमिनेट स्पर्धक आला समोर, हैदराबादची शान अरुण माशेट्टीचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला

मनारा बाहेर गेल्यामुळे घरात आता फक्त मुनव्वर फारुकी व अभिषेक कुमार हे दोन स्पर्धक उरले आहेत. त्यामुळे या दोघांपैकी ‘बिग बॉस १७’चा विजेता घोषित केला जाणार आहे. मनाराच्या आधी या घरातून नुकतेच अरुण माशेट्टी व अंकिता लोखंडे हे दोन स्पर्धक बाहेर पडले.

आणखी वाचा – पाचवीपर्यंतचे शिक्षण अन् आर्थिक अडचणी…; ‘डोंगरीचा मुन्ना’ ते ‘बिग बॉस १७चा’ विजेता, जाणून घ्या मुनव्वर फारुकीच्या एकूण प्रवासाबद्दल…

मुनव्वर व अभिषेक दोघेही घरातील तगडे स्पर्धक आहेत. त्यामुळे आता कोण जिंकेल? याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. दोघांचेही जबरदस्त चाहते आहेत. त्यामुळे त्यांना खूप चांगला प्रतिसाददेखील मिळाला आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या १७च्या विजेते पदाचा मानकरी कोण ठरणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Tags: अभिषेक कुमारअंकिता लोखंडेअरुण माशेट्टीमनारा चोप्रामुनव्वर फारुकीबिग बॉस १७ ग्रँड फिनालेबिग बॉस १७ ग्रँड फिनाले कुठे पहायचेबिग बॉस १७ अपडेटबिग बॉस १७ फायनलबिग बॉस १७ तारीख आणि वेळबिग बॉस १७ विजेताAbhishek kumarankita lokhandearun mashettyBigg Boss 17 Final WinnerBigg Boss 17 Finale in MarathiBigg Boss 17 Finale UpdatesBigg Boss 17 Finalistsbigg boss 17 grand finale updatesBigg Boss 17 Grand Finale updates in MarathiBigg Boss 17 in MarathiBigg Boss 17 salman khanBigg Boss 17 TrophyBigg Boss 17 Winner Name ListBigg Boss in MarathiBigg Boss marathi newsmannara chopraMunawar Faruquisalman khan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Munawar Faruqui won the Bigg Boss 17 show

Bigg Boss 17 Grand Finale  : मुनव्वर फारुकी ठरला ‘बिग बॉस १७'चा विजेता, वाढदिवशी तमाम भारतीयांकडून मिळालं मोठं बक्षीस, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.