सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“९ वर्षाच्या मुलीला…”, आयेशा खानसह झाला होता विनयभंगाचा प्रकार, धक्कादायक प्रसंग सांगत स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “जिन्यावरून ढकललं अन्…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 28, 2024 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ayesha Khan Bigg Boss Contestant

"९ वर्षाच्या मुलीला…", आयेशा खानसह झाला होता विनयभंगाचा प्रकार, धक्कादायक प्रसंग सांगत स्वतःच केला खुलासा, म्हणाली, "जिन्यावरून ढकललं अन्…"

‘बिग बॉस १७’ चा आज महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा उरू व्हायला अवघे काही तास बाकी आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस १७’ या पर्वाचा विजेता नेमका कोण होणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळून राहिल्या आहेत. चाहत्यांसह कलाकार मंडळी फिनालेमध्ये पोहोचलेल्या स्पर्धकांना पाठिंबा दर्शवत त्यांच्यासाठी खास पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. तर एकीकडे ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलेले स्पर्धक विविध माध्यमांना मुलाखती देत आहे. (Ayesha Khan Bigg Boss Contestant)

अशातच एका स्पर्धकाच्या मुलाखतीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री घेतलेल्या आयेशा खानने नुकतीच दिलेली मुलाखत चर्चेत आली आहे. मुन्नवर फारुकीची कथित गर्लफ्रेंड म्हणून आयशाकडे पाहिलं गेलं. अशातच आयेशाने ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर सिद्धांत कननच्या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी आयेशाने तिच्यावर विनयभंग झाल्याचा खुलासा केला. हा धक्कादायक प्रसंग ऐकून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

आणखी वाचा – “२ लाथा मारल्या असत्या…”, BMC च्या कर्मचाऱ्यांनी जातीवरुन चौकशी करताच पुष्कर जोग भडकला, म्हणाला, “डायरेक्ट कानाखाली…”

आयेशाने हा प्रसंग सांगत म्हटलं आहे की, “मला कोणीतरी आवाज दिला म्हणून मागे वळून पाहिलं आणि म्हणाली, हा काका बोला. ते म्हणाले, इकडे ये. त्यानंतर त्यांनी मला एक पत्ता विचारला. मी सांगितलं, हो मला माहित आहे. या बिल्डिंगमध्ये आहे. ते बोलले, मला घेऊन जातेस का? मी म्हणाले, ठीक आहे, चला. मी त्यांना घेऊन गेले. जेव्हा आम्ही पहिल्या मजल्यावरुन खाली उतरत होतो, तेव्हा त्यांनी मला अचानक पायऱ्यांवरून ढकललं. त्यामुळे मी पडले”. हे सांगताना आयेशाला अश्रू अनावर झाले.

Ayesha Khan breaks down while talking about how she was molested at a young age. pic.twitter.com/Hmt1PUXayv

— #BiggBoss_Tak???? (@BiggBoss_Tak) January 27, 2024

आणखी वाचा – Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेवर आरोप केल्यानंतर सुनेला पाठिंबा देण्यासाठी सासू हजर, अभिनेत्रीच्या आईसह दिसली अन् म्हणाली…

पुढे आयेशा म्हणाली, “यानंतर त्यांना मला जे काही करायचं होतं ते करू लागले. मला काहीच कळतं नव्हतं, हे काय होतंय. पण एवढं समजत होतं की, जे काही होतं आहे ते चुकीचं होत आहे. ९ वर्षाच्या मुलीला एवढं काय समजेल? मी ओरडू शकत नव्हते. कारण माझ्या तोंडावर त्यांनी हात ठेवला होता. मी फक्त त्यांना एवढंच सांगण्याचा प्रयत्न करत होती की, माझी आई तिकडे उभी आहे. मला जाऊ द्या. पण त्यांनी मला सोडलं नाही. ईश्वराच्या कृपेने पुढे त्यांनी मला १० मिनिट तिथेच थांबायला सांगितलं आणि ते निघून गेले. जसं मी त्यांना बाहेर जाताना पाहिलं तसं माझ्या डोक्यात आलं, आता इथून पळा”, आयेशा हा प्रसंग सांगताना खूप रडली.

Tags: ayesh khan wild card entryayesha khanayesha khan bigg bossayesha khan contestantentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
Bigg Boss 17 Grand Finale Updates in Marathi

Bigg Boss 17 Grand Finale : टॉप ५ पैकी पहिला नॉमिनेट स्पर्धक आला समोर, हैदराबादची शान अरुण माशेट्टीचा 'बिग बॉस'च्या घरातील प्रवास संपला

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.