Bigg Boss Season 17 Grand Finale Updates : ‘बिग बॉस १७’ या रिऍलिटी शोने सर्वांनाच भुरळ घातली. जगभरात या शोचे लाखो चाहते आहेत. हा शो सुरु झाल्यापासून या शोमधील स्पर्धकांमध्ये सुरु असलेले वादविवाद, भांडण, प्रेम, मैत्री पाहून यंदाच पर्व अधिकच गाजलं. अशातच आता यंदाच्या पर्वाचा महाअंतिम सोहळा सुरु असून काही वेळातच ‘बिग बॉस १७’चा यंदाचा विजेता नेमका कोण ठरणार हे समोर येणार आहे.
‘बिग बॉस १७’चा फिनाले चांगलाच रंगला असून यंदाच्या ट्रॉफीचा मानकरी कोण ठरणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. मुन्नवर फारुकी, अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी हे पाच स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. दरम्यान या पाच स्पर्धकांपैकी एका स्पर्धकाचा ‘बिग बॉस’च्या ट्रॉफी पर्यंतचा प्रवास संपलेला आहे. ‘बिग बॉस १७’ मधील पाच स्पर्धकांमधील पहिला एलिमिनेट झालेल्या स्पर्धकाचे नाव समोर आलं आहे.
हैदराबादची शान असलेल्या अरुण माशेट्टीचा ‘बिग बॉस’च्या या पर्वातील प्रवास संपला आहे. अरुण मष्ट्टी कोण होता हेदेखील बहुतेकांना माहित नसताना अरुणने स्वतःचा खडतर प्रवास पार करत फिनाले पर्यंतचा प्रवास गाठला. अरुणने ‘बिग बॉस’च्या घरात उत्तम खेळी खेळत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अरुणच्या चाहत्यांनीही त्याला प्रचंड प्रतिसाद देत त्याला पाठिंबा दिलेला पाहायला मिळाला.
उर्वरित चार स्पर्धकांमध्ये आता कोणता स्पर्धक ट्रॉफी जिंकणार, कोणाचा प्रवास संपणार, नेमकं काय घडणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. बिग बॉस १७’ च्या महाअंतिम सोहळा रंगात आला असून अखेर चार महिन्यांनी ‘बिग बॉस १७’चा विजेता जाहीर होणार आहे. यासाठी चाहते उत्सुक असून आपल्या लाडक्या स्पर्धकांना सपोर्ट करतानाही दिसत आहेत.