टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय व वादग्रस्त शो म्हणून ‘बिग बॉस’चे नाव घेतले जाते. टीव्हीवरील हा लोकप्रिय शो ओटीटीद्वारेही प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. नुकताच या लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’चा तिसरा सीझन सुरु झाला आहे आणि यात दिवसागणिक अनेक ट्विस्ट येत आहेत. ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या ‘वीकेंड का वार’मध्ये चंद्रिका दीक्षित उर्फ ‘वडापाव गर्ल’ला घराबाहेर पडावे लागले आहे. ‘वडापाव गर्ल’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या चंद्रिकाचा एक प्रोमो व्हायरल झाला होता. या प्रोमोमध्ये अनिल कपूर चंद्रिकाला इतरांच्या प्रश्नांवर सतत बोलल्यामुळे फटकारताना दिसले.
या आठवड्यात लुकेश कटारिया, विशाल पांडे, चंद्रिका दीक्षित, अरमान मलिक आणि शिवानी कुमारी यांना मिड वीक नॉमिनेशनमध्ये नॉमिनेट करण्यात आले होते. पण मतदानाच्या आधारे चंद्रिका दीक्षितचा प्रवास या आठवड्यात बिग बॉसच्या घरात संपला आहे. दिल्लीची चंद्रिका दीक्षित ‘बिग बॉस ओटीटी ३’ मध्ये किमान टॉप ५ मध्ये जाईल असे म्हटले जात होते. पण घरात झालेल्या मतदानामुळे तिचा प्रवास अनपेक्षितपणे संपला आहे.
🚨 NOMINATED Contestants for this week
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) July 14, 2024
☆ Armaan Malik
☆ Luv Kataria
☆ Kritika Malik
☆ Sana Sultan
☆ Naezy
☆ Sai Ketan Rao
☆ Sana Makbul
Comments- Who will EVICT?#BiggBoss_Tak #BiggBossOTT3
‘बिग बॉस ओटीटी ३’च्या या आठवड्यातील नामांकित स्पर्धकांबद्दल बोलताना, चंद्रिका निघून गेल्यानंतर बिग बॉसने पुन्हा नामांकनांची घोषणा केली आहे. त्यामुळे घरातील अरमान मलिक, लव कटारिया, कृतिका मलिक, सना सुलतान, सना मकबुल, साई केतन राव आणि नेझी हे डेंजर झोनमध्ये आहेत. यादरम्यान, अनेकांनी सना सुलतान ही घराबाहेर पडेल असा निष्कर्ष लावला आहे. तसेच काहींनी कृतिका मलिक बाहेर पडेल असं म्हटलं आहे.
दरम्यान, अरमान व कृतिका यांच्यामुळे शोला चांगलाच कंटेट देत आहेत. त्यामुळे कृतिका या घरातून बाहेर पडेल असं वाटत नाही. त्यामुळे आता बाकी सदस्यांपैकी नक्की कोण या घरातून बाहेर पडेल याची उत्सुकता लागून राहिली आहे. तसेच घरातील स्पर्धक खेळात हवे तसे सहभागी होत नसल्यामुळे अनेकांनी हा शो ‘कंटाळवाणा’ झाल्याची तक्रार केली आहे. अ