शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची अनोखी विठ्ठल भक्ती, आईच्या साड्यांपासून केली मूर्तीची सजावट, कौतुकाचा होतोय वर्षाव

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 15, 2024 | 10:50 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Abeer Gulal fame Marathi actor Akshay Kelkar decorated the idol of Vitthal in the house from his mother's sarees.

Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची अनोखी विठ्ठल भक्ती, आईच्या साड्यांपासून केली मूर्तीची सजावट, कौतुकाचा होतोय वर्षाव

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता म्हणजेच अभिनेता अक्षय केळकर हे नाव आता घराघरात पोहोचले आहे. ‘बिग बॉस’ या कार्यक्रमामुळे त्याचं आयुष्यचं बदललं. ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वाच्या विजेतेपदावर अक्षयने नाव कोरलं. ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर अक्षयने मेहनत करत खूप साऱ्या गोष्टी मिळवल्या. यापैकी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचं स्वत:चं हक्काचं घर. काही दिवसांपूर्वी त्याने मुंबईत स्वत:चं घर घेतलं. घर घेतल्यापासून ते गृहप्रवेशापर्यंत…सगळे खास क्षण त्यानं चाहत्यांसोबत शेअर केले आहे. काही दिवसांपूर्वी त्यानं एक व्हिडिओ शेअर करत घराची झलक शेअर केली होती. यावेळी त्याच्या घरातल्या विठ्ठलाच्या मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

अक्षयनं त्याच्या घरात एक विठ्ठलाची मूर्ती ठेवली आहे. खिडकीवरच्या काचेत या विठ्ठलाचं प्रतिबिंब अगदी लाघवी दिसत आहे. अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन त्याच्या घरातील सुंदर अशा विठुरायाच्या मूर्तीचे दर्शन घडवले आहे. अशातच आता त्याने या मूर्तीचा आणखी एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो मूर्तीची सजावट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. घरातील विठ्ठलाच्या मूर्तीला तो पीतांबर व डोक्यावर शेला बांधताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kelkar (@akshaykelkar)

आणखी वाचा – सर्वार्थ सिद्धी योगामुळे सोमवारचा दिवस आहे फारच खास, मेष, वृषभ व कर्क राशीच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेले यश, जाणून घ्या…

विठ्ठलाच्या मूर्तीच्या सजावटीसाठी त्याने आईच्या साड्यांचा वापर  केला आहे. याचाच व्हिडीओ अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला असून त्याने याबद्दल त्याच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “पांडुरंगाला विठू माउली म्हणतात. माझ्या माऊलीच्या म्हणजे माझ्या आईच्या आवडत्या साड्यांपासून माझ्या विठू माऊलीला सजवलं. एरवी साड्यांवर जीवापाड प्रेम करणारी माझी आई, मी तिच्या या अत्यंत आवडत्या दोन साड्या मागितल्यावर लगेच दिल्या”.

आणखी वाचा – “ज्यांनी मदत केली नाही, दुर्लक्ष केले, त्रास दिला अन्…” प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, भावुक होत म्हणाली, “गेल्या दोन वर्षांपासून…”

अक्षयच्या घराला या विठ्ठलाच्या मूर्तीने आणखीनच शोभा आली असल्याचे पाहायला मिळत आहे. घरातील ही मूर्ती अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान, त्याने शेअर केलेल्या व्हिडीओला चाहत्यांसह कलाकारांनीही लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अक्षय सध्या अबीर गुलाल या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.  

Tags: akshay kelkarAkshay Kelkar House Vitthal Murtimarathi actormarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Bigg Boss OTT 3 Vadapav Girl eliminated from the show and also 7 more contestants nominated.

‘बिग बॉस ओटीटी ३’मधून ‘हा’ स्पर्धक घराबाहेर, शिवाय ‘हे’ स्पर्धकही ठरले नॉमिनेशनचे बळी, शोमध्ये चाललंय तरी काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.