मनोरंजन विश्वातील सर्वात लोकप्रिय व वादग्रस्त म्हणून ओळखला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. टीव्हीवरील ‘बिग बॉस’ हा शो ओटीटीद्वारेही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. गेल्या महिन्यात ‘बिग बॉस’ ओटीटीचे तिसरे पर्व सुरु झाले असून हे तिसरे पर्व आता अंतिम टप्प्यात आलं आहे. त्यामुळे या शोची वाटचाल आता महाअंतिम सोहळ्याच्या दिशेने सुरु झाली आहे. या पर्वाच्या अंतिम सोहळ्यासाठी फक्त ८ दिवस उरले आहेत. त्यामुळे हा शो जिंकण्यासाठी स्पर्धकांमध्ये आता चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. घरातील प्रत्येक स्पर्धक अंतिम टप्प्यात जाण्यासाठी आपले सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे.
घरातील आता एका सदस्याने आधीच ठरवले आहे की, त्याला फक्त बक्षिसाची रक्कम जिंकायची आहे. त्याला या शोचे विजेतेपद नको असून त्याला फक्त रक्कम हवी आहे. बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरीने अशी मागणी केली आहे. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये, घराचा प्रमुख रणवीर शौरीला अरमान मलिकला वाचवण्यासाठी आणि इतर तीन सदस्यांना नॉमिनेट करण्यासाठी विशेष शक्ती देण्यात आली होती. सना मकबूल ही ‘आउटसाइडर’ असल्याने तो तिला नॉमिनेट करू शकला नाही, म्हणून रणवीरने नॉमिनेशनसाठी विशाल पांडे, लवकेश कटारिया आणि शिवानी कुमारी यांची निवड केली.
या नामांकन प्रक्रियेपूर्वी रणवीर शौरी आणि अरमान मलिक यांच्यात एक रंजक संवाद झाला. तेव्हा रणवीर व अरमान यांनी स्वत: शो जिंकण्याबद्दल नाही तर शोमधून पैसे कसे जिंकावे यावर चर्चा केली. रणवीरने अरमानला स्पष्ट केले की त्याला ‘बिग बॉस ओटीटी ३’ च्या ट्रॉफीपेक्षा २५ लाखांच्या रोख बक्षीसात जास्त रस आहे. यावेळी अरमान रणवीरला “मला ट्रॉफी तुझ्या हातात हवी आहे” असं म्हणाला. यावर रणवीरने उत्तर “मला ट्रॉफीपेक्षा २५ लाख रुपयांमध्ये जास्त रस आहे. ट्रॉफीपेक्षा मला २५ लाख रुपये हवे आहेत”.
आणखी वाचा – ‘या’ दिवशी सुरु होणार ‘बिग बॉस’चे १८वे पर्व, सलमान खानच असणार होस्ट?, पहिल्या स्पर्धकाचे नावही समोर
पुढे अरमानने म्हटलं की, “पैसे फक्त ट्रॉफीनेच येतील”. यावर रणवीर असं म्हणतो की, “ट्रॉफीचं काय करु?, मला त्याचं लोणचं घालावं लागेल”. दरम्यान, ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये आता विशाल कटारिया, अरमान मलिक, लव कटारिया, शिवानी कुमारी, सना मकबूल, रणवीर शौरी, कृतिका मलिक, नेझी आणि सई केतन राव हे कलाकार घरात राहिले आहेत.