पावसाळा सुरु झाला की सर्वांना वेध लागतात ते कोकणात जाऊन कोकणातील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याचे. अनेकजण पावसाळ्यात कोकणात फिरायला जातात. अनेकजण कोकणात जाऊन कोकणातील निसर्गसौंदर्य पाहण्याचा आणि गावच्या शेतीच्या कामाचा आनंद घेत असतात. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’ मराठी फेम अभिनेता अभिजीत केळकरही कोकणात पोहोचला होता. यावेळी त्याने भातशेतीही केली होती. पावसात भिजत त्याने शेती करतानाचा आणि शेतातच जेवतानाचा अनुभव शेअर केला होता. हा अनुभव शेअर करत त्याने एक खास व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये तो भाताची लावणी करतानाही दिसला.
‘बिग बॉस’ मराठीमुळे अभिजीतला चांगलीच लोकप्रियता मिळाली. याशिवाय अभिजीतने अनेक मराठी मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. आपल्या विविध भूमिकांनी चर्चेत राहणारा अभिजीत सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अभिजीत बरेचदा फिरतानाचे सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करत तो अपडेट देत असतो. अशातच त्याने पुन्हा एकदा गावचा खास व्हिडीओ शेअर केला आहे.
अभिजीतने कोकणातील गावचा खास व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो गुरांना पाणी पाजत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये तो गायींना पाणी पाजत असून त्यांची नावेही सांगत आहे. या व्हिडीओमध्ये तो एका गायीचे नाव हिरा असल्याचे सांगतो आणि एका वासरूचे नाव राणी असल्याचे सांगतो. हा खास व्हिडीओ शेअर करत त्याने “कोकणातल्या गावासारखं सुख नाही” असं म्हटलं आहे.
आणखी वाचा – नवऱ्याच्या नवीन कामानिमित्त ‘तुला शिकवीन…’ फेम अक्षराची खास पोस्ट, म्हणाली, “खूप अभिमान वाटतो की…”
दरम्यान, अभिजीतच्या या व्हिडीओला प्रेक्षकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “मस्त, “खूप छान”, “कोकणातल्या गावासारखं सुख नाही आणि कोकणी माणसासारखे सुखी कोणीच नाही”, “तुझ्या सारख्या निर्मळ मनाचा माणूसच अस करू शकतो बाकी सगळे फक्त दिखावा करतात. तू मनानं गर्भश्रीमंत आहेस अभी” अशा अनेक कमेंट्सद्वारे त्याचे कौतुक केलं असून अनेकांनी त्यांच्या गावाचे नावही विचारलं आहे.