शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अरमान मलिकने गुपचूप उरकलं चौथं लग्न?, मुलांना सांभाळणाऱ्या व्यक्तीशीच जुळलं प्रेम, पायल-कृतिकाचं काय होणार?

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 24, 2024 | 1:55 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss OTT 3 fame Armaan Malik's fourth marriage netizens finds Sandeep name in laksh mehndi video

अरमान मलिकचे चौथे लग्न झाले असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत

‘बिग बॉस ओटीटी २’ मुळे प्रसिद्धी झोतात आलेले नाव म्हणजे अरमान मलिक. अरमान मलिक हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींबरोबर ‘बिग बॉस ओटीटी २’ च्या घरात आला होता. अरमान दोन्ही पत्नींबरोबर ‘बिग बॉस’च्या घरात दाखल झाल्याने त्याच्यावर जोरदार टीका ही करण्यात आली होती. अरमान मलिकने पायलबरोबर घटस्फोट न घेता कृतिकाबरोबर लग्न केले. कृतिका आणि पायल आता एकाच घरात राहतात. अशातच आता सोशल मीडियासह सर्वच माध्यमांवर त्याच्या चौथ्या लग्नाच्या चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. (Armaan Malik Fourth Marriage)

अरमानची पत्नी कृतिकाला एक मुलगा तर पायलला एक मुलगी… असे दोन मुले आहेत. सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्याबद्दल प्रत्येक अपडेट शेअर करताना मलिक कुटुंबिय कायमच दिसतात आणि त्यांनी करवा चौथचाही व्लॉग पोस्ट केला. त्यांच्या मुलांची केअरटेकर लक्षदेखील व्लॉग तयार करते आणि करवा चौथच्या दिवशी तिनेही व्लॉग रेकॉर्ड केला. तिचा व्लॉग पाहून नेटकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात आणून दिली की, तिच्या हातावरील मेहंदीमध्ये संदीप उर्फ अरमान मलिकचे नाव लिहिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Armaan Malik (@armaan__malik9)

आणखी वाचा – “इथे माझा मृत्यू झालाच तर…”, घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकला वैतागून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “बेशिस्त ट्रक चालक…”

तिची ही मेंदी पाहून खळबळ उडाली आणि अरमान मलिकने चौथे लग्न केले की काय, असा सवाल उपस्थित करण्यात येतो आहे. लक्ष ही केअरटेकर मलिक कुटुंबाच्या खूप जवळची आहे आणि ती नेहमी त्यांच्या सर्व व्लॉग्समध्ये त्यांच्याबरोबर असते. यामुळे अरमान मलिकने चौथ्यांदा लग्न केल्याच्या चर्चा होत आहेत. अरमानची केअर टेकर कुटुंबाच्या खूप जवळ आहे आणि ती नेहमीच सर्व व्लॉग्समध्ये दिसते.

आणखी वाचा – Video : मृण्मयी देशपांडेची महाबळेश्वरमधील घरात सुरु आहे धमाल, करणार स्ट्रॉबेरीची शेती, दाखवला संपूर्ण परिसर

करवा चौथच्या व्लॉगमध्येही अरमान मलिक आपल्या पत्नींसाठी तीन भेटवस्तू आणताना दिसला होता, त्यापैकी त्याने फक्त दोन अंगठ्या दिल्या आणि तिसरी अंगठी बाजूला ठेवली. यामुळे केअर टेकर अरमानची तिसरी पत्नी म्हणून मलिक कुटुंबाबरोबर राहते की काय अशी चर्चा होत आहे. त्यामुळे आता अरमान मलिक पुन्हा एकदा त्याच्या लग्नामुळे चांगलाच चर्चेत आला आहे.

Tags: Armaan malikArmaan Malik Fourth MarriageArmaan Malik Fourth Marriage News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
zayed khan life

'मैं हूँ ना'चा अभिनेता आता काय करतो?, हिंदू धर्माची समज नाही म्हणून गोव्यात गुपचूप केलेलं लग्न, कसं जगतो आयुष्य?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.