शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चंदीगढमध्ये घर, १० फ्लॅट, महागड्या कार अन्…; अरमान मलिककडे आहे इतकी संपत्ती, ऑडीमध्ये बसून शाळेत जातो लेक

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 8, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss OTT 3 fame Armaan Malik net worth car collection property know more

चंदीगढमध्ये घर, १० फ्लॅट, महागड्या कार अन्...; अरमान मलिककडे आहे इतकी संपत्ती, ऑडीमध्ये बसून शाळेत जातो लेक

‘बिग बॉस’ हा कायमच चर्चेत राहिलेला शो आहे. ‘बिग बॉस’च्या प्रत्येक पर्वाची जोरदार चर्चा रंगते. त्याचबरोबर प्रत्येक पर्वातील स्पर्धकांचीदेखील चर्चा रंगते. अशातच ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाचीही सध्या जोरदार चर्चा होत आहे आणि यातील स्पर्धक व YouTuber अरमान मलिकही सध्या चांगलाच चर्चेत आहे. जेव्हापासून अरमान मलिक ‘बिग बॉस ओटीटी ३’ मध्ये सहभागी झाला आहे, तेव्हापासून तो कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. त्यामुळे त्याच्याविषयी जाणून घेण्यात त्याच्या चाहत्यांना अधिकच रस आहे. चला तर जाणून घेऊयात अरमान मलिकच्या एकूण संपत्तीबद्दल…

सिद्धार्थ कन्ननबरोबरच्या संभाषणात अरमान मलिकने सांगितले की, त्याची एकूण संपत्ती १०० ते २०० कोटी रुपये आहे. हे पैसे त्यांचे आणि त्यांच्या दोन पत्नींचे असल्याचे त्यांनी गंमतीने सांगितले. अरमानचे चंदिगडमध्ये आलिशान घर आहे. याशिवाय चंदिगडमध्ये त्याचे तब्बल ३५,००० स्क्वेअर फुटांचे प्राण्यांचे फार्मही आहे. हे फार्म प्राणी त्याचे प्राणी प्रेमाबद्दलचे दर्शन घडवते. अरमानला अभिमान आहे की, तो कोणाकडूनही पैसे न घेता केवळ त्याच्या YouTubeच्या  कमाईतूनच शेती करतो. त्यांनी शेतात राबणाऱ्या प्राण्यांसाठी पाच डॉक्टर आणि ६ मजुरांची टीमही ठेवली आहे, जे त्यांची काळजी घेतात.

View this post on Instagram

A post shared by Armaan Malik (@armaan__malik9)

आणखी वाचा – “ना धर्म, ना जात आणि…”, पंढरीच्या वारीत वारकऱ्यांसह वारी करणाऱ्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं वक्तव्य, म्हणाला, “केवळ पांडुरंगासाठी…”

अरमान मलिकने खुलासा केला की, त्याच्या इमारतीतील एकूण दहा अपार्टमेंटपैकी सहा त्याच्या टीम आणि कर्मचाऱ्यांसाठी आहेत. या सहा अपार्टमेंटपैकी एका अपार्टमेंटचे संगीत स्टुडिओमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. यावरुन त्याला असलेली गाण्याची आवडदेखील दिसून येते. त्याने सांगितले की, त्याच्या टीममध्ये एकूण सहा एडिटर, तीन-चार कॅमेरामन, दोन ड्रायव्हर, चार सुरक्षा कर्मचारी आणि नऊ घरगुती मदतनीस यांचा समावेश आहे, हे सर्व या सहा अपार्टमेंटमध्ये राहतात.

आणखी वाचा – “मी खूप दारू प्यायले, ड्रग्जही घेतले अन्…”, रेखा यांचा खासगी आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाल्या, “कुणीही मला विचारलं नाही की…”

दरम्यान, अरमानच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर त्याच्याकडे एकूण तीन अलिशान व महागड्या कार आहेत. याशिवाय त्यांनी सांगितले की, त्यांच्या टीम सदस्यांकडे त्यांच्या स्वत:च्या वैयक्तिक कारदेखील आहेत. ज्या त्यांना अरमानने स्वत: दिल्या आहेत. याशिवाय त्याच्या मुलाला शाळेत जाण्यासाठीही एक महागडी कार आहे.

Tags: Armaan malikBigg Boss OTT 3Bigg Boss OTT 3 News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Singer Usha Uthup's husband Chacko Uthup passed away due to heart attack.

ज्येष्ठ गायिका उषा उत्थुप यांच्या पतीचे निधन, टीव्ही पाहताना हृदयविकाराचा तीव्र झटका

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.