रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ज्येष्ठ गायिका उषा उत्थुप यांच्या पतीचे निधन, टीव्ही पाहताना हृदयविकाराचा तीव्र झटका

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 9, 2024 | 9:25 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Singer Usha Uthup's husband Chacko Uthup passed away due to heart attack.

ज्येष्ठ गायिका उषा उत्थुप यांच्या पतीचे निधन, टीव्ही पाहताना हृदयविकाराचा झटका

‘हरी ओम हरी’, ‘रांबा हो’, ‘डिस्को डान्सर’ आणि अशा अनेक लोकप्रिय गाण्यांच्या गायिका उषा उत्थुप यांच्याबद्दल नुकतीच एक दुःखद बातमी समोर येत आहे. उषा उत्थुप यांचे पती चाको उत्थुप यांचं निधन झालं आहे. काल, ८ जुलै (सोमवार) रोजी त्यांचे निधन झाले. चाको उत्थुप यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. चाको उत्थुप यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चाको उत्थुप यांच्या निधनाची माहिती स्वतः कुटुंबियांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाको उत्थुप घरात टीव्ही पाहात असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर कुटुंबियांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता.

चाको उत्थुप यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, चाको उत्थुप यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचं निधन झालं. आज मंगळवार ९ जुलै रोजी जानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उषा उत्थुप यांचे दुसरे पती जानी चाको उत्थुप हे चहाच्या बागायती क्षेत्राशी संबंधित होते. उषा उत्थुप आणि चाको उत्थुप यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांची भेट पहिल्यांदा ७०च्या दशकाच्या सुरूवातीस प्रथम प्रसिद्ध ट्रिनकासमध्ये भेटले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. चाको उत्थुप हे उषा उत्थुप यांचे दुसरे पती आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kolkata Knight Riders (@kkriders)

आणखी वाचा – चंदीगढमध्ये घर, १० फ्लॅट, महागड्या कार अन्…; अरमान मलिककडे आहे इतकी संपत्ती, ऑडीमध्ये बसून शाळेत जातो लेक

उषा उत्थुप यांनी संगीत क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांना तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार व पद्मभूषण प्रदान करण्यात आला. आजही उषा उत्थुप यांनी गायलेली गाणी प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. अनेक वर्ष उषा उत्थुप बॉलिवूडमध्ये काम केलं आहे.

आणखी वाचा – मेष, मिथुन व कर्क राशींच्या लोकांना मंगळवारी होणार आर्थिक लाभ, व्यवसायातही होणार नफा, जाणून घ्या…

दरम्यान, उषा उत्थुप यांना शशी कपूर यांनी ब्रेक दिला आणि आज उषा उथुप एक प्रसिद्ध गायिका बनल्या उषा उत्थुप यांनी १६ भाषांमध्ये गाणी गायली आहेत. ज्यामध्ये बंगाली, हिंदी, पंजाबी, आसामी, ओरिया, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू या भाषांचा समावेश आहे.

Tags: indian singerUsha UthupUsha Uthup Husband DeathUsha Uthup Husband Death News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Marathi actress Hemangi Kavi shared a sarcastaic post about the weather forecast of rain

"तुमच्या अ'चूक' अंदाजामुळे...", वेधशाळेच्या पावसावरील अंदाजाबद्दल सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट, म्हणाली, "लोक बाहेर पडली नाहीत आणि..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.