शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ना धर्म, ना जात आणि…”, पंढरीच्या वारीत वारकऱ्यांसह वारी करणाऱ्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं वक्तव्य, म्हणाला, “केवळ पांडुरंगासाठी…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 8, 2024 | 3:17 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actor Sandeep Pathak shared his experience about pandharpur Wari.

"ना धर्म, ना जात आणि...", पंढरीच्या वारीत वारकऱ्यांसह वारी करणाऱ्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं वक्तव्य, म्हणाला, "केवळ पांडुरंगासाठी..."

महाराष्ट्राला वारीची मोठी वैभवशाली परंपरा लाभली आहे. आषाढाची चाहूल लागताच वारकऱ्यांना मनाला ओढ लागते ती पंढरीच्या विठुरायाचं सावळे रूप पाहण्याची, त्याला भेटण्याची, त्याचं दर्शन घेण्याची. पंढरपूरचं विठ्ठल-रुक्मिणी हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. विठ्ठलाचं सावळं रूप पाहण्यासाठी भक्त आतुर असतात. चातकाप्रमाणे ते वारीची वाट पाहत असतात. आषाढी वारीच्या निमित्ताने वारकरी मंडळी हळूहळू विठू नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने प्रवास करतात. हा नयनरम्य सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. जीवन समृद्ध करणारी वारी म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीचे भूषण आहे.

वारीचा हा नेत्रदीपक सोहळा अनुभव अनुभवण्यासाठी अनेक वारकरी पालखीत सहभागी होत असतात. सामान्य वारकऱ्यांबरोबरच मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळीही या वारीत सहभाग घेत असतात. असाच वारीत सहभागी होणारा मराठी कलाकार म्हणजे अभिनेता संदीप पाठक. संदीप पाठक गेली अनेक वर्षे या वारी सोहळ्यात सहभाग घेतो. मराठी चित्रपट, नाटक व मालिका अशा सर्व माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता संदीप पाठक यंदाच्या वारीतही सहभागी झाला. या वारी सोहळ्यातील काही खास क्षण त्याने आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sandeep Shyamrao Pathak (@mesandeeppathak)

आणखी वाचा – “सरांना हसताच येत नाही का?”, क्रांती रेडकरच्या व्हिडीओमध्ये समीर वानखेडेंना पाहून कमेंट, म्हणाले, “तुमच्याशी लग्न केल्यापासून…”

अशातच संदीपने त्याच्या वारीचा अनुभव शेअर केला आहे. संदीप पाठकने नुकतीच देवयानी पवार यांच्या युट्यूब वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये संदीप यांना त्यांच्या वारीच्या अनुभवाबद्दल विचारण्यात आले. यावेळी “वारी म्हणजे काय?” असा प्रश्न संदीपला विचारण्यात आला. याचे उत्तर देत संदीपने असं म्हटलं की, “सोप्या भाषेत सांगायचं झालं भारतात अनेक राज्य आहेत. प्रत्येक राज्याची ओळख आहे. त्यापैकी महाराष्ट्र, महाराष्ट्राची संस्कृती व महराष्ट्राचे संस्कार म्हणजे वारी. एकतेचा व मानवतेचा संदेश देणारी काहीशे वर्षांची परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे”.

आणखी वाचा – “मी खूप दारू प्यायले, ड्रग्जही घेतले अन्…”, रेखा यांचा खासगी आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाल्या, “कुणीही मला विचारलं नाही की…”

यापुढे तो असं म्हणाला की, “एक महिना असा येतो की जिथे ना धर्म, ना जात, ना रंग, ना भाषा, गरीबी, श्रीमंती, उच्च, नीच काहीही पाहिलं जात नाही. सगळे एका ध्येयासाठी, केवळ पांडुरंगासाठी, काळ्या मातीतली माणसं काळ्या विठ्ठलासाठी अविरतपणे चालत राहतात. उद्देश काही नाही. स्वार्थ काही नाही. निस्वार्थपणे चालत राहतात. ती परंपरा, ती संस्कृती, ते संस्कार म्हणजे वारी आहे”.  

Tags: marathi actormarathi entertainment newssandeep pathakSandeep Pathak Wari News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
rakhi sawant on being mother

कधीच आई होऊ शकणार नाही राखी सावंत, अभिनेत्रीला दुःख अनावर, म्हणाली, "विकी डोनरसारखं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.