शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी खूप दारू प्यायले, ड्रग्जही घेतले अन्…”, रेखा यांचा खासगी आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाल्या, “कुणीही मला विचारलं नाही की…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 8, 2024 | 2:02 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bollywood actress Rekha revealed in an old interview that she drank a lot of alcohol and took drugs also.

"मी खूप दारू प्यायले, ड्रग्जही घेतले अन्...", रेखा यांचा खासगी आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाल्या, "कुणीही मला विचारलं नाही की..."

कधी कधी बॉलिवूडच्या झगमगाटामागे खूप गोष्टींचा अंधार पडलेला असतो. मात्र अनेकजण फक्त त्या झगमगाटाकडे लक्ष देतात अंधाराकडे नाही. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची वेगळी कथा असते. जर कोणी आनंदी दिसत असेल तर त्याचा अर्थ असा नाही की त्याच्या मनात दुःख नाही.  बॉलिवूडमधील अशाच एक लोकप्रिय अभिनेत्री ज्यांनी लहानपणापासूनच त्यांच्या आयुष्यात अनेक समस्या पाहिल्या आहेत. त्यांनी ज्याच्यावर प्रेम केले ती व्यक्त त्यांना सापडली नाही आणि ज्याच्याशी त्यांनी लग्न केले त्या व्यक्तीनी त्यांची साथ सोडली. तरीही रेखाच्या चेहऱ्यावर कायम हास्यच दिसते. मात्र या हसऱ्या चेहऱ्यामागे अनेक दु:खांचा भार आहे. या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रेखा.

रेखा यांनी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. रेखा यांची लव्हलाईफ अनेकदा चर्चेत राहिली आहे. बॉलिवूडमध्ये कार्यरत असताना अनेकदा अनेक अभिनेत्यांबरोबर त्यांचे नाव जोडले गेले आहे. नवीन निश्चल याच्यानंतर जितेंद्रने किरण कुमार आणि नंतर विनोद मेहरा यांच्याशीही त्यांचे नाव जोडले गेले होते. विनोद मेहराबरोबरच्या त्यांच्या लग्नाच्या अनेक बातम्याही आल्या होत्या. पण रेखा यांनी नेहमीच या सर्व गोष्टींचे खंडन केले. या कलाकारांबरोबरच अमिताभ बच्चन व रेखा यांच्या नात्याबद्दलच्यादेखील अनेक चर्चा रंगल्या होत्या आणि त्या चर्चा आजही रंगताना दिसतात.

८०च्या दशकात अमिताभ व रेखा हे  पहिल्यांदा ‘दो अंजाने’ या चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. यानंतर दोघांनी जवळपास १० चित्रपट एकत्र केले. त्यांचा शेवटचा एकत्र चित्रपट ‘सिलसिला’ (१९८१) होता. ज्यानंतर दोघांचे मार्ग कायमचे वेगळे झाले. अमिताभ बच्चनपासून वेगळे झाल्यानंतर रेखाने १९९०मध्ये मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले पण काही महिन्यांनंतर त्यांनी आत्महत्याही केल्याचा आरोप आहे. त्यानंतर रेखाने एकटे राहणे स्वीकारले आणि आजही तेच जीवन जगत आहे.

आणखी वाचा – नवऱ्याच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन, ऐश्वर्या नारकरांनी अविनाश यांना केकही भरवला अन्…; फोटो व्हायरल

रेखा या अगदी खुल्या मनाची महिला आहेत आणि त्यांनी नेहमीच मोकळेपणाने बोलणे पसंत केले आहे. सिमी गरेवालच्या शोमध्ये रेखा यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा स्वीकार केल्याचे म्हटलं होतं. ‘टाईम्स नाऊ’च्या वृत्तानुसार, जेव्हा सिमी गरेवाल यांनी रेखा यांना मद्यपानाच्या सवयीबद्दल विचारले. तेव्हा रेखा यांनी असं म्हटलं की, “अर्थात मी खूप दारु प्यायले आहे आणि मी खूप ड्रग्जदेखील घेतले आहे. पण मला कोणी विचारलं का की, मी असं का करते? आयुष्याकडून मला काय मिळालं आणि काय नाही?”

आणखी वाचा – “सरांना हसताच येत नाही का?”, क्रांती रेडकरच्या व्हिडीओमध्ये समीर वानखेडेंना पाहून कमेंट, म्हणाले, “तुमच्याशी लग्न केल्यापासून…”

यापुढे “तुम्ही तुमचे हृदय एखाद्या विवाहित व्यक्तीला दिल्याबद्दल काय सांगाल?” असाही एक प्रश्न सिमी गरेवालने त्यांना विचारला. यावर रेखा यांनी उत्तर देत असं म्हटलं होतं की, “मी त्याच्यावर (अमिताभ बच्चन) मनापासून प्रेम करते. पण कोणाचे घर तोडून मी कधीच आनंदी होऊ शकत नाही. त्यामुळे मी कधीच माझा हक्क मागितला नाही आणि नेहमी त्याच्या सुखासाठी प्रार्थना करते”.

Tags: bollywood actressBollywood entertainment newsrekha
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
Next Post
Ajinkya Nanaware and Shivani Surve

पावसात एकटाच बाईक राईडला गेला नवरा, व्हिडीओ पाहिल्यानंतर शिवानी सुर्वेला आला राग, म्हणाली, "मी तुला नको म्हटलं आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.