शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वात वाईल्ड कार्ड स्पर्धक एल्विश यादवने मारली बाजी, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाला, “सिस्टीम…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 16, 2023 | 10:04 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Ott 2 Winner

Bigg Boss Ott 2 Winner

Bigg Boss Ott 2 Winner : ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शोच्या इतिहासात नाव कोरावं अशी घटना घडली आहे. आजवर वाईल्ड कार्ड एंट्री घेतलेला स्पर्धक विजेता झालेला पाहायला मिळाला नव्हता. मात्र ‘बिग बॉस ओटीटी’चं यंदाचं पर्व ऐतिहासिक ठरलं, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या अटीतटीच्या लढाईत एल्विश यादव या स्पर्धकाने बाजी मारली असून ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वाच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.

‘बिग बॉस ओटीटी’च्या टॉप पाच स्पर्धकांमध्ये पूजा भट्ट, अभिषेक मल्हान, एल्विश यादव, मनिषा रानी व बेबिका धुर्वे यांना पाहणं रंजक ठरलं. त्यानंतर अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव या दोघांमध्ये मतांची जोरदार टक्कर पाहायला मिळाली. अखेर एल्विशने विजेतेपदावर नाव कोरत इतिहास रचला. यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे.

पाहा विजेता झाल्यावर एल्विशने काय प्रतिक्रिया दिली (Bigg Boss Ott 2 Winner)

एल्विशने इंस्टग्राम पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे, या पोस्टमध्ये एल्विशने लिहिले आहे की, “एल्विश आर्मी तुमचे मनापासून धन्यवाद. हा तुमचा विजय आहे. तो सुरुवातीपासून तुमचाच होता. एल्विश यादव तुम्हा सर्वांशिवाय काहीच नाही. मी तुम्हाला हे अनेकदा सांगितलं आहे आणि आता पुन्हा एकदा सांगतो. तुम्ही भरभरुन देत असलेल्या प्रेमासाठी मी खरंतर पात्र नाही, पण तुम्ही मला ते अधिकाधिक देत आहात. यासाठी मी तुमचे आभार शब्दात मांडू शकत नाही”.

हे देखील वाचा – “४ ओळी, २०० टेक अन्…” ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ चित्रपटासाठी ऑडिशन देताना या अभिनेत्रीला आले होते पॅनिक अटॅक, म्हणाली, “तब्बल ४ तास…”

यापुढे म्हणत एल्विशने म्हटलं आहे की, “बघा तुमच्या याच प्रेमाखातर मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकली. ही ट्रॉफी एल्विश आर्मीची आहे. हे सर्व काही तुमचं आहे. मी पण तुमचाच आहे. तुम्ही फक्त माझ्याबरोबर राहा. माझ्याकडे व्यक्त होण्यासाठी शब्द नाहीत. फक्त हे लक्षात ठेवा तुमच्यामुळेच मी आहे. सिस्टम हँग केलं ना..”.

हे देखील वाचा – हिंदी सिनेमांना बॉलिवूड म्हणण्यावर सनी देओलने घेतला आक्षेप, स्पष्टचं म्हणाला, “हिंदुस्थान…”

View this post on Instagram

A post shared by Elvish Raosahab (@elvish_yadav)

एल्विशने बिग बॉस ओटीटीच्या ८ आठवड्यांच्या खेळात चौथ्या आठवड्यात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री घेतली होती. अभिषेक आणि एल्विश यांपैकी कोण जिंकणार? याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या लढाईत एल्विशने बाजी मारली.

Tags: bigg boss ott 2bigg boss ott 2 winnerelvish yadav
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bharat Jadhav new Drama

अभिनेते भरत जाधव 'हे' नवं नाटक घेऊन येणार प्रेक्षकांच्या भेटीला, दिसणार कधीही न पाहिलेल्या भूमिकेत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.