रविवार, मे 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi: तन्वीचं वचन तिच्या आजीने पूर्ण केलं, प्रभू शेळकेच्या कुटुंबाला दिली खास भेट

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 3, 2026 | 12:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 6

तन्वीचं वचन तिच्या आजीने पूर्ण केलं

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी सीझन ६’ आता अंतिम टप्प्यात पोहोचल्यामुळे, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा शो सुरू झाल्यापासून या शोने सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या ट्विस्ट्स आणि नात्यांच्या चढ-उतारांमुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवले. या प्रवासात काही मैत्री घट्ट झाल्या, तर काही नाती तुटताना देखील पाहायला मिळाली. यंदाच्या सीझनमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेलं नातं म्हणजे तन्वी कोलते आणि प्रभू शेळकेच्या भाऊ-बहिणीचं नातं. सुरुवातीपासूनच तन्वीने प्रभूला भाऊ मानत त्याची काळजी घेतली. गावाकडून आलेल्या प्रभूला काही गोष्टी समजत नसताना तन्वीने त्याला नेहमी मार्गदर्शन केलं.

प्रभूच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी तन्वी त्याच्या सोबत ठामपणे उभी राहिलेली दिसली. घरातून आलेलं पत्र असो किंवा कोणताही भावनिक प्रसंग तिने नेहमी त्याला आधार दिला. ‘फॅमिली वीक’मध्येही तन्वीने आपुलकीची भावना दाखवत प्रभूच्या आईला स्वतःची नवी साडी भेट दिली आणि या नात्याला अजूनच घट्ट केलं. याच काळात तिने प्रभूला एक खास वचन दिलं होतं त्याला टीव्ही घेऊन देण्याचं. प्रभू घराबाहेर पडल्यानंतर तन्वी खूप भावूक झाली होती. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मर्यादित असल्यामुळे त्यांच्या घरी टीव्ही नव्हता. मात्र, तन्वी स्वतः घरात असतानाही तिच्या कुटुंबाने तिचं वचन पूर्ण केलं आणि प्रभूच्या घरी टीव्ही पोहोचवून तिच्या शब्दाला खरी उतरली.

आणखी वाचा – ‘पारू’ मालिकेचा अचानक END, पण ‘ही’ जोडी दिसणार पुन्हा एकत्र, उत्सुकता वाढली

View this post on Instagram

A post shared by vidhishah_❤️ (@__vidhii18__)

या घटनेचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये तन्वीची आजी प्रभूच्या कुटुंबाला भेट देताना आणि टीव्ही देताना दिसते. इतकंच नव्हे, तर आजींनी प्रभूच्या आईला साडीही भेट दिली. तन्वीने घरात राहूनही दिलेला शब्द पाळल्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिच्या बहिणीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेला हा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – ‘कमळी’ मालिकेत मोठा TWIST! आजीचा विश्वासघात, कमळीला कानाखाली मारली अन् घराबाहेर काढलं

Tags: Bigg Boss Marathi 6entertainment newsmarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
Effects of Wearing Long Heels

तुम्हीही जास्त वेळ हिल्स घालून असता का?, गुडघ्यांवर होईल गंभीर परिणाम, वाचा सविस्तर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.