Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चं घर म्हटलं की वाद हे आलेच. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात निक्की तांबोळी, अरबाज पटेल, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर, वैभव चव्हाण, जान्हवी किल्लेकर, आर्या जाधव, घनःश्याम दरवडे, पॅडी कांबळे, धनंजय पवार, सूरज चव्हाण ही कलाकार मंडळी धुमाकूळ घालताना दिसत आहेत. मात्र भाऊच्या धक्क्यावर या दोन्ही टीमचा पर्दाफाश झाला. स्पर्धकांचे खरे चेहरे एकमेकांसमोर आले. स्पर्धकांनी एकमेकांविरोधात केलेलं गॉसिप समोर आल्याने त्यांच्यात दुरावा आला. टीम ए व टीम बी एकत्र झाली असून निक्की आता एकटी पडली असल्याचं दिसत आहे.
दरम्यान निक्की व अभिजीत टास्कमुळे एकत्र आहेत. टीम ए मधून निक्की तांबोळीने एक्झिट घेतली आहे आणि इतर सदस्य निक्कीच्या विरोधात उभे असलेले दिसत आहेत. निक्कीने यापूर्वी सर्व स्पर्धकांना मानसिक त्रास दिल्याने आता सगळेच जण तिच्या विरोधात एक झाले आहेत. जे कर्म निक्कीने यापूर्वी केलं ते पुन्हा तिच्या वाटेला आलं असल्याचं दिसत आहे. अरबाजने कॅप्टन्सी उमेदवारी सोडत ती निक्कीला बहाल केली. कारण अरबाज व निक्की यांची मैत्री तेव्हा घट्ट होती. मात्र आता तीच कॅप्टनसी निक्कीच्या अंगावर उलटली असल्याचं तिचं म्हणणं आहे. निक्कीला हीच कॅप्टन्सी भारी पडली असल्याचं चित्र सध्या ‘बिग बॉस’च्या घरात दिसत आहे.
निक्की अभिजीतकडे मन मोकळ करताना दिसत आहे. शिवाय नुकत्याच झालेल्या नॉमिनेशन प्रक्रियेत निक्कीचं नाव आलं असल्याचं दिसत आहे. निक्की, अभिजीत, वर्षा, अंकिता हे स्पर्धक यंदाच्या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत. अशातच कलर्स मराठीचा एक प्रोमो समोर आला आहे. यामध्ये असं पाहायला मिळत आहे की, अभिजीत निक्कीला म्हणतो, “तू वाईट वागली आहेस, आणि ज्याप्रकारे तू त्याला दुखावलं आहेस याबद्दल ते बोलत आहेत”.
यावर निक्की म्हणते, “मी वाईट वागलेच नाही आहे. मीच व्हिलन ठरले आहे आणि तो हिरो झाला आहे. त्याला आता सगळ्यांची साथ मिळत आहे त्यामुळे त्याला हे कळत नाही आहे की, एक स्त्री १०० लोकांवर भारी पडू शकते. आणि एका पुरुषाचा रागही एक महिलाच थोपवू शकते, आणि महिलेकडे ही ताकद आहे हे त्याला कळत नाही आहे. मला कॅप्टन्सी भारी पडली. मी नॉमिनेट पण झाले”. यावर अभिजीतही म्हणतो, “खूपच जास्त भारी पडली आणि तुझ्यामुळे मला पण भारी पडली”.