रविवार, जून 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“संपूर्ण महाराष्ट्र रडला”, सूरजच्या कुटुंबाला Bigg Boss मध्ये आलेलं पाहून प्रेक्षकांनाही रडू आवरेना, म्हणाले, “इतकी साधी माणसं…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 27, 2024 | 6:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
suraj chavan viral video

सूरज चव्हाणचया कुटुंबीयांचे होत आहे कौतुक

‘बिग बॉस मराठी’चं पाचवं सध्या खूप गाजत आहे. यामधील सर्व सदस्य हे चर्चेत राहिले आहेत. मात्र हा कार्यक्रम १०० दिवसांऐवजी ७० दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या ६ ऑक्टोबर रोजी महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे आता विजेता कोण असणार? याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे. आतापर्यंत या कार्यक्रमामध्ये अनेक ट्विस्टदेखील आले. मात्र हा कार्यक्रम एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. यामध्ये सध्या फॅमिली स्पेशल एपिसोड सुरु आहे. गुरुवारी पार पडलेल्या भागात अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार यांच्या कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. त्यांची कुटुंबियांबरोबर झालेली भेट खूप भावुक असलेली देखील दिसून आली. (suraj chavan viral video)

आजच्या भागाचे काही प्रोमो समोर आले आहेत. यामध्ये अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, पंढरीनाथ कांबळे व निक्की तांबोळी यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. अशातच आता सूरजचे कुटुंबीय घरात भेट देणार आहेत. हा प्रोमो नुकताच समोर आला आहे. यामध्ये सूरजला भेटण्यासाठी त्याच्या बहिणी व आत्या आल्या आहेत. ‘कलर्स मराठी’ने नुकताच हा भावुक करणारा वव्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : इंडस्ट्रीत काम देणार म्हणून जान्हवी वर्षाताईंची सेवा करत असल्याचे निक्कीकडून टोमणे, हे नाटक की अभिनेत्रीचा खरा स्वभाव?

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

हा व्हिडीओ समोर येताच सूरजच्या चाहत्यांनी प्रेम व्यक्त केले आहे. तसेच अनेकांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, “इतकी साधी माणसं आहेत, त्या सर्वांनी घरात जाण्याच्या आधी चपला काढल्या”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “आज महाराष्ट्र रडणार”, अजून एका नेटकऱ्याने लिहिले की, “तसा मी कधी रडत नाही. पण हे बघून डोळे कधी भरले हे कळलं पण नाही”, त्याचप्रमाणे अजून एकाने लिहिलं की, “सर्वसामान्यांना संधी दिल्याबद्दल कलर्स मराठी व ‘बिग बॉस’चे आम्ही आभारी आहोत”, तसेच अजून एकाने लिहिले की, “सूरज तू खूप काही मिळवलंस, फक्त आई-वडील नाहीत हे सुख पाहायला. खरच खूप पुण्यवान असतील तुझे आई-वडील. असाच यशस्वी हो”.  

आणखी वाचा – शेवटी बापच तो! लेकींना पाहून स्वत:ला सावरु शकला नाही पॅडी, एकमेकांना घट्ट मिठी मारली तेव्हा…

दरम्यान आता हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वांचेच लक्ष वेधले गेले. सूरजच्या बहिणी व आत्या यांनी घरात येण्याआधी चपला घराच्या बाहेर काढल्यामुळे त्यांचे खूप कौतुक करण्यात आले आहे.

Tags: commentsSuraj Chavanviral video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Abhijeet Sawant Wife business

अभिजीत सावंतच्या बायकोचा आहे स्वतःचा व्यवसाय, स्वतः तयार करते विविध प्रकारचे केक, करते खूप मेहनत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.