‘बिग बॉस मराठी’ हा लोकप्रिय टीव्ही शो नेहमीच चर्चेत असतो. यंदा ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्वही विशेष चर्चेत असलेलं पाहायला मिळालं. आता हे पर्व अंतिम टप्प्यात आलं आहे. त्यामुळे दिवसेंदिवस ‘बिग बॉस’च्या घरात नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. दिवसेंदिवस प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. खरं तर ‘बिग बॉस’च्या प्रत्येक सीझनमध्ये खेळ शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर एक फॅमिली वीक असतो. या वीकमध्ये स्पर्धकांचे कुटुंबिय ‘बिग बॉस’च्या घरात भेटीसाठी येत असतात. अशातच नुकतीच यंदाच्या पर्वाचा फॅमिली वीक सुरु झाला आहे. (Abhijeet Sawant Wife)
कालच्या भागात या पर्वातील सुप्रसिद्ध गायक अभिजीत सावंतच्या कुटुंबियांना पाहायला मिळालं. अभिजीतला भेटायला पत्नी व दोन्ही मुली आल्या होत्या. त्यांना पाहून अभिजीतचे अश्रू अनावर झाले. अभिजीतला दोन महिन्यांनी पाहून त्याच्या दोन्ही लेकीही त्याला मिठी मारुन ढसाढसा रडू लागल्या. अभिजीतच्या पत्नीने म्हणजेच शिल्पाने त्याचं त्याच्या खेळाचं भरभरुन कौतुक केलेलं पाहायला मिळालं. शिवाय योग्य त्या ठिकाणी अभिजीतने निर्णय घेऊन स्वतःचा विचार करायला हवा कारण हा एक खेळ आहे याची जाणीवही तिने अभिजीतला करुन दिली.
अभिजीतच्या पत्नीचं नाव शिल्पा एडवणकर-सावंत असं आहे. शिल्पा यांचा अस्मी या नावाने केकचा बिझनेस आहे. याची माहिती त्यांनी स्वत:च्या इन्स्टाग्राम Bio मध्ये लिहिलेली आहे. शिवाय अस्मि या नावाने त्यांचं एक वेगळं इन्स्टाग्राम अकाउंट आहे. यामध्ये त्यांनी बनवलेले स्वादिष्ट, सुंदर थीम केक पाहायला मिळत आहेत. हे सुंदर केकची ती ऑनलाईन ऑर्डरही स्वीकारते. याबाबतही तिने पोस्ट द्वारे सांगितलेलं दिसतंय. अभिजीतच्या वाढदिवसालाही तिने खास आंब्याचा फ्लेवर असलेला मँगो केक बनवला होता, याचा सुंदर असा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवरुन पोस्ट केला आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : डीपीने निक्कीची हात जोडून मागितली माफी, ‘ती’ एक गोष्ट पटली नाही म्हणून…; असं काय घडलेलं?
अभिजीत व शिल्पा यांचा प्रेमविवाह आहे. कॉलनीतील बालपणीच्या मैत्रिणीशी प्रेम करुन त्याने लग्नही केलं. इंडिअन आयडॉलचे विजेतेपद जिंकल्यानंतर त्याने पुढील दोन वर्षात लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला जवळपास २० वर्ष पूर्ण झाली आहेत. अभिजित व स्मिताला स्मिरा व आहना अशा दोन मुली आहेत.