Bigg Boss Marathi Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’ सीजन ५ हे पर्व विशेष गाजताना दिसलं. यंदाच्या या पर्वाच्या विजेतेपदावर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सूरज चव्हाणने आपलं नाव कोरलं. यंदाची ‘बिग बॉस’ची ट्रॉफी सूरज चव्हाणने बारामतीत नेली असल्याचे दिसलं. बारामतीकर सूरज चव्हाण ‘बिग बॉस’ विजेता झाल्यानंतर विशेष चर्चेत आलेला पाहायला मिळाला. सबंध महाराष्ट्रातून सूरजवर भरभरुन कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांच्या प्रेमापोटी आणि त्याच्या खेळाडू वृत्तीच्या स्वभावानं सूरजने ही मानाची ट्रॉफी पटकावली. ‘बिग बॉस’ नंतरही सूरज बराच चर्चेत असलेला पाहायला मिळतोय.
‘बिग बॉस’च्या घरात असतानाच सूरजचे सर्व स्पर्धकांबरोबर चांगले संबंध होते. घराबाहेर पडल्यानंतरही तो सर्व स्पर्धकांशी मिळून मिसळून वागताना दिसतोय. घरात असताना रितेश देशमुख कडूनही भाऊच्या धक्क्यावर सूरजच भरभरुन कौतुक झालेलं पाहायला मिळालं. योग्य तो खेळ खेळत सूरजने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सुरुवातीला ‘बिग बॉस’च्या घरात सूरज चव्हाणला पाहून सह स्पर्धकांची आणि प्रेक्षकांचीही नाराजी पाहायला मिळाली. या खेळात येऊन हा काय करणार, ज्याला नीट लिहिता येत नाही, नीट वाचता येत नाही, तो हा खेळ कसा खेळणार असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले मात्र या सर्व प्रश्नांना सडेतोड उत्तर देत सूरजने ‘बिग बॉस’ची मानाची ट्रॉफी पटकावली.
आणखी वाचा – “हवं तर टोल घ्या पण…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची ट्रॅफिकला वैतागून पोस्ट, म्हणाली, “सकाळी सात वाजता…”
लिहिता वाचता येत नसलं तरी माणसं ओळखायला सूरज चुकला नाही आणि त्याने कधीही त्याच्यातली माणुसकी सोडली नाही याच एका गोष्टीमुळे सूरज यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला. भरघोस बक्षीस घेत सूरजने ‘बिग बॉस’च्या घराबाहेर एक्झिट केलेली पाहायला मिळाली. सूरज चव्हाण विजेता झाल्यानंतर त्याला ‘बिग बॉस’च्या ट्रॉफी तर मिळालीच याशिवाय १४ लाख ६० हजार रुपये इतकी रक्कमही त्याने पटकावली. तर पु.ना. गाडगीळ यांच्याकडून १० लाखांचा चेक मिळाला.
इतकंच नव्हे तर त्याला एक सुंदर अशी पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्याकडून डायमंड ज्वेलरी देखील मिळाली. तसेच त्याला विजेता होताच इलेक्ट्रिक स्कूटरही भेट म्हणून मिळाली. इलेक्ट्रिक स्कुटर सूरजच्या हातात येताच त्याने त्याच्या नव्या स्कुटरबरोबरचा फोटो सोशल मीडियावरुन पोस्ट करत आभार व्यक्त केले आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.