आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने टोल माफीची मोठी घोषणा केली. मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांसाठी ही टोलमाफी आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारच्या या निर्णयावर अनेक नागरीकांनी आनंद व्यक्त केला. ‘हा एक उत्तम निर्णय आहे. सर्वांसाठीच आहे. असे अनेक निर्णय सर्वसामान्यांसाठी घेतले पाहिजे आणि त्याच्यावर सतत विचार केला पाहिजे’. अशा अनेक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. मात्र एका मराठी अभिनेत्रीने यासंबंधित नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. (Apurva Nemlekar On Toll and Traffic)
कलाकार मंडळी ही सोशल मीडियावर काहीना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. कधी आपले फोटो-व्हिडीओ असोत किंवा कधी कामाबद्दलची माहिती असो. कलाकार मंडळी अनेकदा सामाजिक व राजकीय परिस्थितीवरही भाष्य करत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अशातच अपूर्वाने टोलसंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. अपूर्वाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये रस्त्यावर खूप ट्रॅफिक असल्याचे पाहायला मिळत आहे आणि या ट्रॅफिकला वैतागूनच तिने ही पोस्ट शेअर केली आहे.
अपूर्वाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ट्रॅफिकचा फोटो शेअर करत “हवं तर टोल घ्या पण लेन्स (वाहनांची रांग) सुरु करा. सकाळी सात वाजता अशक्य ट्रॅफिक जाम, एक त्रस्त ठाणेकर!” असं म्हटलं आहे. सकाळच्या ट्रॅफिकला वैतागून तिने ही पोस्ट लिहिली असून नागरीक रांगेची शिस्त पायलट नसल्याबद्दलचा तिचा राग यातून व्यक्त होत आहे. अपूर्वा नेमळेकर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच अभिनेत्रीने केलेल्या एका पोस्टमुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा – लक्ष्मी आली घरा! सुप्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री झाली आई, लग्नाच्या नऊ वर्षांनी दिली गुडन्यूज
दरम्यान, अपूर्वाने ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंताची भूमिका साकारली होती. तिने साकारलं हे पात्र प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं. या लोकप्रिय मालिकेनंतर अपूर्वा स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या लोकप्रिय मालिकेमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे, या मालिकेत अभिनेत्री सावनी हे पात्र साकारत आहे.