Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अहिल्यादेवींनी प्रियाला गोंधळ असल्याचे सांगतात. गोंधळासाठीचा प्रसाद हा सूनेनेच बनवावा लागतो असेही सांगतात, त्यामुळे प्रियाला खूपच टेन्शन आलेलं असतं. तर प्रिया किचनमध्ये जाते आणि पारुला जेवण करता येत नसल्याचे सांगते. तेव्हा पारू सांगते, ‘इतकंच ना तर मी तुम्हाला शिरा कसा करायचा हे शिकवते’. प्रियाला जेवण करता येत नाही ही गोष्ट दामिनीला कळते. दामिनी त्यांचं सगळं बोलणं चोरून ऐकत असते त्यानंतर ती येऊन मोहनला सुद्धा याबद्दल सांगते. त्यावर मोहन सांगतो की, ‘तू सुद्धा गावाकडूनच आली आहेस आणि तुला किती काय बनवता येते हे आम्हाला चांगलंच माहित आहे’. यावर दामिनी शांत बसते.
त्यानंतर अहिल्यादेवी सगळ्यांनाच बोलावून घेतात आणि पारूलाही तिथे बोलवून घेतात. पारूवर गोंधळाची सर्व जबाबदारी आणि पाहुणे मंडळींची जबाबदारी त्या सोपावतात. सगळेच जण आपापल्या कामाला लागतात. तर इकडे प्रीतम त्याच्या खोलीत बसलेला असतो तेव्हा त्याच्या मनात दिशाचा विचार येतो. दिशा शेवटी बोलून गेलेली असते की, किती काही झालं तरी मी तुम्हाला कोणाला सोडणार नाही, तिचे हे शब्द प्रीतमच्या डोक्यात घोंगावत असतात. तितक्यात तिथे प्रिया मॅडम येतात. प्रिया प्रीतमला हात लावते तेव्हा तो दचकून दिशाच नाव घेतो. त्यानंतर तो प्रिया मॅडमची माफी मागतो. यावर प्रियाही त्याला समजून घेते. गोंधळासाठीचा प्रसाद बनवण्यासाठी अहिल्यादेवी, दामिनी, सगळ्या स्वयंपाक घरात जमलेल्या असतात.
आणखी वाचा – लक्ष्मी आली घरा! सुप्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री झाली आई, लग्नाच्या नऊ वर्षांनी दिली गुडन्यूज
तेव्हा प्रियाला प्रसाद बनवायला सांगितला जातो. अहिल्यादेवी सांगतात तुला माझ्यामुळे अवघडल्यासारखं होऊ नये म्हणून मी बाहेरच थांबते तू तुझ्या परीने हवा तसा बनव आणि त्या जाता जाता दामिनीलाही बाहेर घेऊन जातात. मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, प्रियाला तिच्या वडिलांचा फोन येतो त्यामुळे प्रियाचं लक्ष प्रसादावरुन निघतं आणि भाजलेला रवा करपतो. तर मालिकेच्या पुढील भागात, आदित्यने पारुला पैंजण गिफ्ट केलेली असते.
आणखी वाचा – ‘सिंघम अगेन’मधून सलमान खान बाहेर, रोहित शेट्टी व अजय देवगणने अचानक घेतला निर्णय, पण यामागचं कारण काय?
मात्र पारूने ती घेतलेली नसते. तिच्या म्हणण्यानुसार ती पायात घालायची असते आणि त्यानुसार पारूच्या पायात आदित्य घराबाहेरच पैंजण घालतो. आणि हे सगळं काही दामिनी पाहते. पारू-आदित्यला धनी असा आवाजही देते. हे पाहून तर दामिनीला धक्काच बसतो. आता दामिनी पारू व आदित्यच हे सत्य सगळ्यांसमोर कसं आणणार हे पाहणं रंजक ठरेल.