Neha Gadre Announce Pregnancy : अनेक अभिनेत्री सध्या आई होणार असल्याची आनंदाची बातमी देताना दिसत आहेत. इतकंच नव्हे तर काही अभिनेत्रींच्या घरी चिमुकल्या पाहुण्यांचं आगमनही झालेलं आहे. सोशल मीडियाद्वारे ही कलाकार मंडळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक अपडेट चाहत्यांसह शेअर करताना दिसतात. अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने चाहत्यांसह एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. एक काळ मालिकाविश्वावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीने आई होणार असल्याची गुडन्यूज इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत दिली आहे. ही अभिनेत्री म्हणजे नेहा गद्रे. गेली बरीच वर्ष ही अभिनेत्री मालिकाविश्वात कार्यरत नसल्याचं समोर आलं आहे.
‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेतून नेहा गद्रे व कश्यप परुळेकर ही जोडी घराघरांत पोहोचली. ‘गडबड झाली’, ‘मोकळा श्वास’ या चित्रपटांमधूनही नेहाने प्रसिद्धी मिळवली. ‘गडबड झाली’ हा अभिनेत्रीचा शेवटचा चित्रपट. यानंतर नेहा ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली. ईशान बापटबरोबर लग्न झाल्यानंतर तिने संसाराकडे लक्ष केंद्रित केले आणि अभिनयसृष्टीतून ब्रेक घेतला. साधारण दोन वर्षांपूर्वी नेहाने ऑस्ट्रेलियात राहून शिक्षिकेची पदवी मिळवली. ऑस्ट्रेलियात स्थायिक असलेली नेहा आता लवकरच आई होणार आहे. तिने आपल्या नवऱ्यासोबत चा बेबी बंप दाखवत एक गोड व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये नेहा व तिचा नवरा समुद्रकिनारी फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत.
नेहा व ईशानने ऑस्ट्रेलियातील टंगलूमा बीचवर फोटोशूट करत ही गोड बातमी दिली आहे. तिच्या या गोड बातमीवर चाहत्यांनी तसेच सेलिब्रिटींनी तिचं अभिनंदन केलं आहे. “Our greatest adventure is about to begin” असे म्हणत तिने ही गोड बातमी सोशल मीडियावर सांगितली आहे. मूळची पुण्याची असलेली नेहा काही दिवसांपूर्वी तिच्या आईवडिलांना भेटायला पुण्याला आली होती. यावेळी नेहाने तिच्या मित्र मैत्रिणींची खास भेटही घेतलेली पाहायला मिळाली.
आणखी वाचा – पूजा केली, हार घातला अन्…; सूरज चव्हाणला मिळाली गाडी, आनंद व्यक्त करत शेअर केले फोटो
५ वर्षांपूर्वी नेहाने ईशानबरोबर लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर ती ऑस्ट्रेलियातच स्थायिक झालेली पाहायला मिळाली. अभिनय क्षेत्र सोडून ती तिची फॅमिली लाईफ एन्जॉय करत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये नेहा शिक्षिका म्हणून काम करतेय. याशिवाय तिने डिप्लोमा इन अर्ली चाईल्डहूड एज्युकेशन अँड केअर यामध्ये पदवी मिळवली. ज्याचा फायदा तिला शाळेत मुलांना शिकवताना होत आहे.