शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “तुम्ही भिडा, नडा आणि…”, सूरज चव्हाणला रितेश देशमुखचा फुल्ल सपोर्ट, कौतुक करत म्हणाला, “संपूर्ण महाराष्ट्र…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 11, 2024 | 11:15 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi Season 5 riteish deshmukh on suraj chavan

'बिग बॉस मराठी'मध्ये रितेश देशमुखकडून सूरज चव्हाणला पाठिंबा, सर्वांसमोर कौतुकही केलं

Bigg Boss Marathi Season 5 :  ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ सुरु झाल्यापासून या पर्वाची खूप चर्चा सुरु आहे. यंदाच्या या पर्वात प्रत्येक स्पर्धक धुमाकूळ घालताना दिसत आहे. यंदाच्या या पर्वात एका स्पर्धकाची विशेष चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली तो स्पर्धक म्हणजे सूरज चव्हाण. सूरजने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आज सूरजला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळताना पाहायला मिळत आहे. केवळ प्रेक्षकच नव्हे तर कलाकार मंडळीही सूरजला सपोर्ट करताना दिसत आहेत. काल झालेल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी स्पर्धकांची शाळा घेतली. यावेळी रितेशने सूरजच भरभरुन कौतुक केलेलं पाहायला मिळालं.

भाऊच्या धक्क्यावर, “सूरज आजचा तुमचा लूक चांगला आहे. तुम्ही ‘बिग बॉस’च्या घरात काय काम करता?”, असा प्रश्न रितेश देशमुख सूरज चव्हाणला विचारतो. यावर उत्तर देत सूरज म्हणतो, “गार्डनमधील कचरा काढतो”. यावर रितेश म्हणतो, “मी ‘बिग बॉस’ हिंदीचे १६ सीझन पाहिले आहेत. मराठीपण पाहिले आहेत. इतर भाषेतीलही पाहिले आहेत. त्यामध्ये असं जाणवत की, प्रत्येक कामाची मूल्यता आखली जाते. प्रत्येक कामाचा दर्जा ठरवला जातो. जस की, किचनमध्ये केलं जाणार काम हे जास्त महत्त्वाचं आहे. तर सर्वात कमी लेखलं जाणार काम म्हणजे साफसफाई”.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : किर्लोस्कर बंगल्यात मंगळागौरचे खेळ सुरु, दिशा-दामिनीचा प्लॅन फसला, आदित्यने सुखरूपपणे पारूची सुटका केली अन्…

View this post on Instagram

A post shared by Suraj Chavan (@official_suraj_chavan1151)

पुढे रितेश म्हणाला, “बऱ्याच सीझनमध्ये मी हे पाहिलं आहे की त्या कामाकडे अशा नजरेने पाहतात की, त्या कामाला हात लावायचा नाही. पण सूरज ‘बिग बॉस’च्या इतिहासात तुम्ही एकमेव आहात ज्याने या कामाला कमी लेखलं नाही. सगळे ड्युटी म्हणून साफ करतात. मला अभिमान वाटतो हे सांगायला की, तुम्ही हे घर स्वतःच घर म्हणून साफ करताय. बिग बॉस’च्या घरात असा एक स्पर्धक असेल ज्याने या घराला आपलं घर मानलं असेल तर सूरज चव्हाण ते तुम्ही आहात. सूरज आपण घरातील धूळ, कचरा काढता तेव्हा नकारात्मकता बाहेर जाते. मला कळतंय तुम्ही टास्क खेळायला घाबरता. कसं बोलायचं, काय बोलायचं याच दडपण येत. बाकीच्यांना समजत मला का कळत नाही. याचा तुम्ही विचार करता”.

आणखी वाचा – “मला खरंच बाहेर यायचं आहे…”, Bigg Boss च्या घरात योगिता चव्हाणला होत आहे मानसिक त्रास, म्हणाली, “माझा निर्णय…”

सूरजला पाठिंबा देत रितेश असंही म्हणाला की, “सूरज तुम्ही भिडा, नडा. आणि तो तेज तुमच्यात मला दिसला. एका बुक्कीत तुझं मुंडक छाटिन, हे सांगितलं तुम्ही एक हिंमत दाखवली. तुम्ही काय बोलताय ते कोणाला कळत असेल का असं तुम्हाला वाटत असेल तर त्याचा विचार करु नका. कोणाला फरक पडत नाही. तुम्ही पण फरक पाडून घेऊ नका. समोरच्याला कळलं नसेल तर तुमचं मत मांडा. इथं जरी लोक ऐकत नसतील तर महाराष्ट्र ऐकत आहे”.

Tags: bigg boss marathibigg boss marathi season 5riteish deshmukh on suraj chavan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Next Post
Bigg Boss Marathi season 5 jahnavi killekar fired

Bigg Boss Marathi : रितेश देशमुखने निक्कीविरोधात केलेली चुगली सांगताच जान्हवी चक्कर येऊन पडली, शुद्धच हरपली अन्…; नक्की काय झालं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.