शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला खरंच बाहेर यायचं आहे…”, Bigg Boss च्या घरात योगिता चव्हाणला होत आहे मानसिक त्रास, म्हणाली, “माझा निर्णय…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 11, 2024 | 9:59 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi Season 5 yogita chavan big statement

बिग बॉस'च्या घरातून योगिता चव्हाणला यायचं आहे बाहेर, मानसिक त्रास होतं असल्याचं कारण दिलं...

Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस’ मराठी सीझन ५ मध्ये एकामागोमाग एक रंजक वळण येत आहेत. पहिल्या आठवड्यात स्पर्धकांच्या चुकांवर रितेश देशमुखने चांगलीच शाळा घेतली. तर आता दुसऱ्या आठवड्यातही भाऊच्या धक्क्यावर रितेश चुकलेल्यांची शाळा घेताना दिसला. ‘बिग बॉस’च घर म्हटलं की वाद हे आलेच. प्रत्येक स्पर्धक स्वतःला सिद्ध करण्यासाठी उत्तम खेळ खेळताना दिसत आहे. ‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वातील स्पर्धक योगिता चव्हाणही देखील उत्तम खेळ खेळत असून तिचं खुद्द रितेश देशमुख यांनी कौतुक केलं. मात्र योगिताने भाऊच्या धक्क्यावर केलेलं भाष्य खूप धक्कादायक होतं. उत्तम खेळ खेळणाऱ्या योगिताने हा शो सोडण्याबाबत भाष्य केलं.

भाऊच्या धक्क्यावर रितेश योगिताला म्हणतो, “योगिता तुम्ही छान खेळताय. फक्त टास्कमध्ये गेम दाखवू नका तर इतर वेळीही दाखवा. लक्ष द्या आणि अजून छान खेळा”. रितेश एकूणच ‘बिग बॉस’च्या घरातील योगिताच्या उत्तम खेळाचं कौतुक करतो. त्यावेळी हात वर करत मला काही बोलायचं आहे असं खुणावते. यावर रितेश योगिताला बोलायची संधी देतो. त्यावेळी योगिता म्हणते, “सर मला काही गोष्टींचा खूप मानसिक त्रास होत आहे. आणि मला माहित नाही हे बोलणं कितपत योग्य आहे. पण मला खरंच बाहेर यायचं आहे”.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : किर्लोस्कर बंगल्यात मंगळागौरचे खेळ सुरु, दिशा-दामिनीचा प्लॅन फसला, आदित्यने सुखरूपपणे पारूची सुटका केली अन्…

View this post on Instagram

A post shared by Yogita Chavan (@official_chavan_yogita)

पुढे योगिता म्हणाली, “मी संपूर्ण टीमची माफी मागते. इथे खूप लोक बोलतात की तू यायलाच नाही पाहिजे होतं. आणि त्यांचं बोलणं अगदी बरोबर आहे. कदाचित माझा निर्णय चुकला असेल. मी माफी मागते. पण खरंच मला इथे खूप त्रास होत आहे”, असं सांगत ती ढसाढसा रडू लागते. यावर रितेश म्हणतो, “कोणी बाहेर यायचं हे खरंतर माझ्या हातात नाही आहे. ते प्रेक्षकांच्या हातात आहे. मी एवढंच सांगेन की, चढ-उतार, भावुक होणं हे प्रत्येक गेममध्ये होत आणि खासकरुन ‘बिग बॉस’मध्ये जास्त होत असतील. पण आतापर्यंत आम्हाला असं कधीच वाटलं नाही की, योगिता गेम सोडायचा विचार पण करत असेल. कारण ती इमेज तुमची आहे”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “भोग आता कर्माची फळं”, रितेश देशमुखने जान्हवीला सुनावताच प्रेक्षकांना आनंद, म्हणाले, “आली रे आली आत हिची बारी आली”

पुढे रितेश असंही म्हणाला, “आता तुम्ही असं सांगताय तेव्हा वाटलं की योगिता असा का विचार करत आहेत. त्या छान खेळत आहेत. तुम्ही सांगायच्या आधीच मी तुम्हाला हे म्हणालो की तुम्ही छान खेळत आहात. तुमच्यात क्षमता आहे तुम्ही संधी सोडू नका. थोडा वेळ जाऊद्या. विचार करा. इतरांबरोबर बोला. आणि तुम्ही खूप स्ट्रॉंग महिला आहात. खूप शुभेच्छा”, असं म्हणत तिला खेळायला उत्तेजन दिलं. आता ‘बिग बॉस’च्या घरात योगिता कसा खेळ खेळणार, हे पाहणं रंजक ठरेल.

Tags: bigg boss marathibigg boss marathi season 5riteish deshmukh on yogita chavam
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 riteish deshmukh on suraj chavan

Bigg Boss Marathi : "तुम्ही भिडा, नडा आणि…", सूरज चव्हाणला रितेश देशमुखचा फुल्ल सपोर्ट, कौतुक करत म्हणाला, "संपूर्ण महाराष्ट्र…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.