‘पारू’ मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे सावित्रीची मंगळागौर सांगून सगळेच तयारीला लागलेले असतात. तर अहिल्यादेवी सगळेजण काम करत आहेत की नाही हे पाहत असतात. तर इकडे पारू व प्रिया मॅडम पारूच्या घरी तयार होतात. दोघी इतक्या सुंदर दिसतात की दोघीही एकमेकांची दृष्ट काढतात. प्रीतम व श्रीकांत काम करत असतात त्यांना अहिल्यादेवी सांगतात की, तुम्ही आता रूम मध्ये जाऊन बसा. तुमचं काही इथे काम नाही. मात्र प्रीतम व श्रीकांत दोघेही सांगतात की, अजून थोडं आमचं काम बाकी आहे. यावर अहिल्यादेवींच्या लक्षात येतं की हे मुद्दाम करत आहे त्यानंतर ते मोहनला बोलवायचं कारण सांगतात मात्र अहिल्यादेवी त्यांना ओरडतात आणि रूममध्ये बसायला सांगतात. (Paaru Serial Update)
अहिल्यादेवी खाली येतात तेव्हा सगळ्याजणी म्हणतात की, चला आपण मंगळागौरीचे खेळ सुरु करुया. यावर सावित्री सांगते पण पारू अजून आली नाही. त्याच वेळेला तिथे दिशा व दामिनीसुद्धा आलेले असतात. दामिनी सांगते की, मंगळागौर तुझी आहे मग पारू तुला कशाला हवी. इतक्यातच पारू व प्रिया सुंदर अशी नऊवारी साडी घालून आलेल्या असतात. त्या येतात तेव्हा सगळेच जण त्यांना पाहू लागतात. त्यानंतर मंगळागौरीचे खेळ सुरु होतात. सगळेजण खेळ खेळू लागतात तेव्हा दिशाही खेळ खेळत असते. तितक्यात दिशाच्या हातून सूप पडतं. दिशा सांगते की, मला हा गेम खेळायचाच नाही. यावर पारू तिच्याजवळ जाते आणि तिला सांगते की, तुम्हाला मी शिकवू का?, हे सगळं काही अहिल्यादेवी बघत असतात मात्र दिशा पारूचा अपमान करते आणि त्या वेळेला अहिल्यादेवी दिशाला सांगतात की कोणी काही आपल्याला शिकवत असेल तर त्याच्याकडून शिकून घ्याव.
हे ऐकल्यावर दिशाचा अजूनच घोर अपमान होतो तर श्रीकांतच्या मदतीने प्रीतम मोहन आणि आदित्य मंगळागौरीचे खेळ पाहत असतात. त्यावेळेला आदित्य पारुला शोधत असतो मात्र पारू त्याला कुठे दिसत नाही. त्यानंतर पारूला शोधायला म्हणून बाहेर येतो आणि तिच्या घरी जातो तर घरी पण कोणीच नसतं कारण इकडे दामिनीने पारुला अहिल्यादेवीना हे खेळ खेळायचे आहेत पण त्यांची कळशी ही अडगळीच्या खोलीत आहे असं सांगून ती आणायला पाठवलेलं असतं. तर सावित्रीला पारू कुठे गेली याची कुणकुण लागलेली असते. आदित्य जेव्हा पारूच्या घरी जातो तेव्हा पाहतो तर पारू तिथे नसते. त्यावेळेला वैजूच्या मागून मागून तो जातो. तर वैजू अडगळीच्या खोली जवळ जाते. तेव्हा पारू जोरजोरात दार आपटते आणि सांगते की, मी इथे अडकले आहे. प्लीज मला बाहेर काढा.
तेव्हा आदित्य दरवाजाची कडी उघडतो. तितक्यात पारू बाहेर येते. देवी आईची कळशी आणायला आले होते पण कोणीतरी बाहेरुन दरवाजा लावून घेतला असं ती सांगते. त्यानंतर दोघेही बंगल्यात जायला निघतात. तेव्हा आदित्य पारुला बघून सांगतो की, तू आज खूप छान दिसतेस. हे ऐकून पारू गालातल्या गालात हसते. आता मालिकेच्या येणाऱ्या भागात पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरेल.