Bigg Boss Marathi Update : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ हा वादग्रस्त शो असल्याचं पाहायला मिळत आहे. या शोमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. यंदाच्या या सीझनमध्ये गायक, अभिनेता, कीर्तनकार, रॅपर, रील स्टार अशा विविध क्षेत्रातील लोकांना एक उत्तम प्लॅटफॉर्म मिळवून दिला आहे. यंदाच्या सीझनमध्ये निक्की तांबोळी या स्पर्धकाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. भाऊचा धक्कामध्ये तर रितेश देशमुखने निक्कीची चांगलीच कानउघडणी केलेली पाहायला मिळाली.
निक्की तांबोळीचा प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या स्पर्धकासह वाद झालेला पाहायला मिळाला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’ हे कॅप्टनसी कार्य पार पडणार आहे. या टास्कदरम्यान घरातील सर्व सदस्य सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसणार आहे. दरम्यान बॉलिवूड गाजवणारी निक्की तांबोळी आणि रॅपर आर्या जाधवमध्ये कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे. एकमेकींबरोबर भिडतानाचा त्यांचा प्रोमो समोर आला आहे. ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’ या टास्कमध्ये कोण विजयी होणार आणि कोणाला पहिला कॅप्टन होण्याचा मान मिळणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.
कॅप्टनला यंदा नक्की कोणते अधिकार मिळणार हे पाहणंही रंजक ठरणार आहे. नुकताच निक्की व आर्या यांचा भांडतानाचा एक प्रोमो समोर आला आहे. आर्या निक्कीला बोलते, “हात नाही लावायचा. ‘बिग बॉस’ ही वैयक्तिक होत मला धक्का देत आहे”. यावर निक्की आर्याला म्हणते, “तू तिथे ओरडायचं इथे नाही ओरडायचं”. असं म्हणत निक्की आर्याला धक्का देते. यावर चिडून आर्या म्हणते, “मी तुझ्या कानात ओरडेन. फालतू, चिप. आता मी जर धक्का द्यायला आले ना निक्की तर…”, असं म्हणत अडवणाऱ्या निक्कीला आर्या धक्का देते. आणि दोघांमध्ये धक्काबुक्की होते.
या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत आर्याला सपोर्ट केला आहे. “आर्या तिला कानात सांगायची गरज नाही तिला जमिनीवर आदळलं पाहिजे”, “ही निक्की अरबाजच्या जीवावर जरा जास्तच उड्या मारते पण तोच एक दिवस तिला खाली आपटवेल”, असं म्हणत निक्कीला बोल लगावत आर्याला पाठींबा दिला आहे.